Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक बाई रोज बँकेत यायची आणि कोणतंही काम न करता बसून राहायची.
बँकेतल्या शिपायाच्या ते लक्षात आलं. त्यानं मॅनेजरला जाऊन सांगितलं.
मॅनेजर त्या बाईकडं गेला आणि म्हणाला,
तुमचं नेमकं काम काय आहे?
तुम्ही रोज बँकेत का येता?
.
.
.
.
.
बाई : मला घरी काही काम नाही. मी तुमचा कर्मचारी मनोहर लालची बायको आहे. विराट, जडेजा आणि रोहितच्या बायका जशा त्यांच्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये जातात, तशीच मीही माझ्या नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी आलेय.
…
रात्री खूप थंडी वाजत होती.
मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली
मी डिसेंबरचं नाव बदलून एप्रिल ठेवलं!
…
काही वर्षांपूर्वी ५ वर्षे बँकेत ठेवलेले पैसे दुप्पट व्हायचे.
आता ५ वर्षांनी बँक राहील की नाही कळत नाही!
…
वटपौर्णिमेच्या दिवशी नवरा बायकोला म्हणाला…
दिवसरात्र माझ्याशी भांडत असतेस तरी
वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्म मीच मिळावा म्हणून प्रार्थना का करतेस?
बायको - खूपच हुशार दिसताय!
तुम्हाला एवढं सुधारल्यावर दुसऱ्या कोणाला कशाला देऊ?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या