मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : तुम्हाला काय त्रास आहे, असं जेव्हा डॉक्टर पेशंट तरुणीला विचारतात…

marathi jokes : तुम्हाला काय त्रास आहे, असं जेव्हा डॉक्टर पेशंट तरुणीला विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
Jun 28, 2024 10:03 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : तुम्हाला काय त्रा आहे, असं जेव्हा डॉक्टर पेशंट तरुणीला विचारतात…
marathi jokes : तुम्हाला काय त्रा आहे, असं जेव्हा डॉक्टर पेशंट तरुणीला विचारतात…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

ट्रेंडिंग न्यूज

पन्नाशीच्या पुढचे पुरुष या बाबतीत आनंदी आहेत! ते म्हणतात..

तीन चांगल्या गोष्टी आमच्या बाबतीत सुदैवानं लवकर झाल्या.

मॅगी यायच्या आत आम्ही मोठे झालो.

WhatsApp यायच्या आत आमचं शिक्षण झालं.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे

मोबाईल यायच्या आत आमचं लग्न झालं.

मालकानं नवीन स्टाफला त्याचा मोबाइल नंबर विचारला…

तो म्हणाला, 98 खटाखट खटाखट!

अरे नीट सांग 

काय साहेब ही काय सांगायची गोष्ट आहे होय! 

लिहा 97 8500 8500

डॉक्टर - बोला, काय त्रास आहे?

तरुणी - मोबाइल काढते आणि म्हणते,

हे बघा मेसेजला ब्लू टिक आलीय. म्हणजे पाहिलाय

पण रिप्लाय आला नाही!

(डॉक्टर आता शेती करतात)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel
विभाग