Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायको - मी रोज देवाची पूजा करते.
कधी तरी श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं एवढीच इच्छा आहे.
नवरा - एकदा मीराबाई बनून विष पी.
श्रीकृष्णच काय, सगळ्या देवांचं दर्शन होईल!
…
एक माणूस पावसात भिजत कुडकुडत चालला होता…
त्याच वाटेवरून छत्री घेऊन जाणारी एक तरुणी म्हणाली,
हवं तर तुम्ही माझ्या छत्रीत येऊ शकता
माणूस - नको ताई. थांबेल पाऊस म्हणत तो पुढं निघून गेला
तुम्ही म्हणाल किती सभ्य माणूस आहे.
खरंतर, मागून त्याची बायको येत होती.
…
बायकोच्या गप्पा आणि भटजीचे मंत्र एक सारखेच असतात…
काही समजत नसलं तरी मन लावून ऐकायचं नाटक करावंच लागतं!
…
नवरा-बायको दोघे टेरेसवर बसलेले असतात.
व्हिस्की घोट घेत घेत नवरा म्हणतो,
मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही!
बायको म्हणते, खरं की काय?
हे तुम्ही बोलताय की तुमच्या हातातली व्हिस्की
नवरा - नाही गं वेडे, मीच बोलतोय, व्हिस्कीला
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या