Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक दिवस घरी जाताना व्हॉट्सअॅप बघत चाललो होतो,
त्या नादात शेजारच्या घरात कधी घुसलो कळलंच नाही!
आश्चर्य म्हणजे,
शेजारणीनं मला चहा बनवून दिला. तिचं लक्ष टीव्ही सीरियलमध्ये होतं.
घरात नेमकं कोण आलंय हे तिलाही कळलं नाही.
जोक अजून बाकी आहे…
मी आरामात चहा पित होतो, तेवढ्यात शेजारणीचा नवरा आला.
मला बघून तो सॉरी बोलून म्हणाला,
चुकून तुमच्या घरात आलो!
…
नवरा(बायकोला)- आज मी यूट्यूबवरून ऑपरेशन करायला शिकलो...
तुझ्या कुठल्या नातेवाईकाचं हृदय, किडनी, फुफ्फुसाचं ऑपरेशन करायचं असेल तर मला सा
बायको - हे धोकादायक आहे... असले प्रयोग करत जाऊ नका. असं व्हिडीओ पाहून काही येतं का?
नवरा - रेसिपीचे व्हिडीओ बघून तू माझ्यावर खतरनाक प्रयोग करतेस ते चालतं का?
…
नवरा - ही घराची साफसफाई कधी संपणार?
मला भूक लागलीय.
बायको - आता थोडंच राहिलंय. तुम्ही राहू द्या. जाऊन जेवण बनवा
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)