Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पप्पू एकदा टप्पूला विचारतो…
पप्पू - वहिनी नेहमी चेहऱ्यावर पदर घेऊन का असतात?
टप्पू - कारण तिचं नाव प्रतिभा आहे.
पप्पू - मग काय झालं?
टप्पू - मला माझ्या प्रतिभेचं प्रदर्शन सर्वांसमोर करायला आवडत नाही!
…
गणिताचा क्लास सुरू असतो…
गुरुजींनी विचारलं, १ हजार किलो म्हणजे एक टन
तर, ३ हजार किलो म्हणजे किती टन?
बंड्या - लगेच उठला आणि म्हणाला, टण, टण, टण
(गुरुजी कन्फ्युज झाले ह्याला वर्गाबाहेर हाकलू की याचं कौतुक करू)
…
एक महिला नटून थटून नवऱ्यासमोर गेली आणि म्हणाली,
सांगा ना, कमी कशी दिसतेय?
नवरा - (तिच्याकडं रागानं बघून) असं वाटतं की तुला पाकिस्तानात फेकून देऊ
बायको - ईश्शsss तुमचं आपलं काहीतरीच!
सरळ सांगा बॉम्ब दिसतेय म्हणून
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)