Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
गुरुजी - रात्री झोपेत असताना मच्छर चावला तर काय करायला पाहिजे?
बंड्या - खाजवून गुपचूप झोपायला पाहिजे.
कारण आपण कोणी रजनीकांत नाही की मच्छरला 'सॉरी' बोलायला लावू!
…
आज माझी बायको फक्त एवढंच बोलली की,
आज मी माहेरी जातेय…
आई शप्पथ! कारल्याची भाजी पण पनीरसारखी लागायला लागली!
…
काही लोक व्हॉट्सअॅपवर फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाइट एवढेच मेसेज टाकतात.
असं वाटतं की व्हॉट्सअॅप नावाच्या दुकानाचं फक्त शटर उघडण्याची आणि बंद करण्याची ड्युटी त्यांना लागलीय आणि
आपल्याला मालाची खरेदी-विक्री करायची!
…
पप्पूला प्रश्न विचारला गेला…
रेडिओ आणि वर्तमानपत्रामध्ये काय फरक आहे?
पप्पू चटकन बोलला, सर रेडिओमध्ये चपात्या गुंडाळता येत नाहीत!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या