marathi jokes : एक वैतागलेला माणूस मेडिकलमध्ये जाऊन जेव्हा विषाची बाटली मागतो…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : एक वैतागलेला माणूस मेडिकलमध्ये जाऊन जेव्हा विषाची बाटली मागतो…

marathi jokes : एक वैतागलेला माणूस मेडिकलमध्ये जाऊन जेव्हा विषाची बाटली मागतो…

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 23, 2024 03:06 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : एक वैतागलेला माणूस मेडिकलमध्ये जाऊन जेव्हा विषाची बाटली मागतो…
marathi jokes : एक वैतागलेला माणूस मेडिकलमध्ये जाऊन जेव्हा विषाची बाटली मागतो…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

एक माणूस मेडिकलच्या दुकानात गेला…

दुकानदाराला म्हणाला, एक विषाची बॉटल द्या

दुकानदार - चिठ्ठी असल्याशिवाय देणार नाही

त्या माणसानं लग्नाची पत्रिका दाखवली!

दुकानदार भावूक झाला आणि म्हणाला,

कोणती बॉटल देऊ? मोठी की छोटी?

जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत होरपळून नष्ट होतं की काय ही भीती आहे!

तर ती म्हणाली, मग लोणचं करू की नको यंदा?

मी मेलीनं इतकं राबायचं आणि नंतर खायला कोणीच नाही असं व्हायचं!

(नवरा हातातला पेपर ठेवून बाहेर गेला)

हेही वाचा: सुखी संसारासाठी सर्वात चांगलं आसन कोणतं?

बायको - मला वाटतं मी फार दिवस जगणार नाही!

नवरा- मग मी पण जगणार नाही, मरून जाणार

बायको - अहो पण मी आजारी आहे. त्यामुळं मला मरण दिसतंय. तुम्ही कशाला मरणार?

नवरा - मला आनंद सहन होणार नाही ना!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner