marathi jokes : पंख असूनही उडू शकत नाही असा पक्षी कोणता, असं जेव्हा गुरुजी विचारतात…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : पंख असूनही उडू शकत नाही असा पक्षी कोणता, असं जेव्हा गुरुजी विचारतात…

marathi jokes : पंख असूनही उडू शकत नाही असा पक्षी कोणता, असं जेव्हा गुरुजी विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
Updated Jun 22, 2024 07:02 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : पंख असूनही उडू शकत नाही असा पक्षी कोणता, असं जेव्हा गुरुजी विचारतात…
marathi jokes : पंख असूनही उडू शकत नाही असा पक्षी कोणता, असं जेव्हा गुरुजी विचारतात…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

शाळेत पर्यावरणाचा तास सुरू असतो…

गुरुजी विचारतात, मुलांनो सांगा पाहू

असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख असूनही तो उडू शकत नाही!

बंड्या हात वर करतो.

गुरुजी म्हणतात, सांग बंडू

बंड्या - मेलेला पक्षी

(बंड्या मरेस्तोवर मार खातो)

हेही वाचा : सुखी संसारासाठी सर्वात चांगलं आसन कोणतं?

गुरुजी - मी जे काही विचारेन, त्याचं उत्तर पटापट द्या!

सर्व मुले - हो गुरुजी

गुरुजी - भारताची राजधानी कोणती?

बंड्या - फटाफट

(गुरुजी बंड्याला अजून हाणतायत)

पप्पू - गुरुजी, थोडासा आठवतो.

गुरुजी - ठीक आहे, जेवढा येतो तेवढा सांग

पप्पू - …आणि याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात!

(गुरुजींनी पप्पूला हाण हाण हाणला)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner