मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : सुखी संसारासाठी सर्वात चांगलं आसन कोणतं?

marathi jokes : सुखी संसारासाठी सर्वात चांगलं आसन कोणतं?

HT Marathi Desk HT Marathi
Jun 21, 2024 06:15 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : सुखी संसारासाठी सर्वात चांगलं आसन कोणतं?
marathi jokes : सुखी संसारासाठी सर्वात चांगलं आसन कोणतं?

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

गुरुजी - मुलांनो, एक दिवस योग करा.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सगळं काही विसरून जाल!

ट्रेंडिंग न्यूज

बंड्या - गुरुजी, तुम्ही एकदा फेसबुकवर येऊन तर बघा

योग वगैरे सगळं विसरून जाल!

बायको काही बोलली तर तुमची मान दोन वेळा वर खाली करायची!

हा योग सगळ्या योगांचा बाप आहे!

कुठलाही ताण-तणाव तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही!

मात्र हा योग करताना मान चुकूनही डावीकडे-उजवीकडे फिरणार नाही याची काळजी घ्या!

तसं झाल्यास होणाऱ्या साइड इफेक्टला जगात औषध नाही!

बायको - मी तीन वर्षापासून वटपौर्णिमा करत नाहीये, तरीही तुम्ही ठणठणीत कसे?

नवरा - अगं मी रोज व्यायाम करतो. स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घेतो!

बायको - ते काही नाही. तुमच्यासाठी कोण उपवास करतंय ते खरं खरं सांगा!!

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel