Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक दारुड्या त्याच्या मित्राला म्हणतो…
आज तोपर्यंत प्यायची, जोपर्यंत समोरची तीन झाडं ६ दिसत नाहीत.
बारमधला वेटर हे ऐकतो आणि म्हणतो…
बस करा रे नालायकांनो,
समोर फक्त एक झाड आहे
आता काय जंगल बनवणार का?
…
एका गावात पहिल्यांदाच लाइट येणार होती
सर्व गाव खूष होता. लोक अक्षरश: नाचत होते
एक कुत्रा पण नाचत होता.
एकानं विचारलं, तू का नाचतोयस रे
कुत्रा म्हणाला, गावात लाइट आली तर पोल सुद्धा लागणार ना!
…
मराठीच्या प्राध्यापकांनी ‘शिवी’ या शब्दाची व्याख्या करायला सांगितली!
नेहमीप्रमाणे राजू उठला…
सर, अत्यंत राग आल्यानंतर शारीरिक स्वरूपात हिंसा न करता,
तोंडी हिंसा करण्यासाठी वापरलेल्या शब्दसमूहाला 'शिवी' असं म्हणतात.
या शब्दसमूहाच्या उच्चारानंतर मनुष्याला परम आनंद आणि शांती मिळते.
गुरुजींनी राजूचे पाय धरले!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)