Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक माणूस बोलला,
मी माझ्या बायकोला बारावी शिकवली. बीए करू दिलं… एमए करू दिलं…
सरकारी नोकरी लावून दिली.
दुसरा म्हणाला, तू तर बापापेक्षाही मोठं कर्तव्य पार पाडलंस!
आता फक्त एक काम कर,
एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून दे!
…
एक माणूस - साहेब, माझी बायको हरवलीय!
दुसरा - अहो, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय
हे पोस्ट ऑफिस आहे, पोलीस स्टेशन नाही
तो - ओह माफ करा!
आनंदाच्या भरात कुठं जायचं तेच कळत नाहीए!
…
एक महिला नवऱ्यासोबत देवळात गेली!
नवसाचा धागा बांधून नवस केला
पण नंतर लगेच धागा सोडून टाकला!
नवरा म्हणाला, काय झालं? धागा का काढलास?
बायको - काही नाही वो!
मी नवस केला होता की तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर होवो.
पण नंतर मला वाटलं, ह्या नवसानं माझंच काम तमाम होईल की काय?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)