Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बाबा - हे घे बाळा २ हजार रुपये
बंड्या - बाबा हे कशासाठी?
बाबा - घे रे, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत.
बंड्या - बाबा कोड्यात का बोलताय? सांगा ना
बाबा - तू जेव्हापासून फोन घेतलायस, तेव्हापासून वॉचमन ठेवायची गरज लागली नाही!
…
पिंट्या - जगात दोन प्रकारचे नेटवर्क सगळ्यात पावरफुल असतात.
चिंट्या - कुठले रे?
पिंट्या - एक ई-मेल आणि दुसरा फीमेल
एका मिनिटात इकडची बातमी तिकडे.
…
बाबा - तुझा रिझल्ट कसा लागलाय?
मुलगा - गुरुजी म्हणत होते, या वर्गात तुला अजून एक वर्षे लागेल.
बाबा - दोन-तीन वर्षे लागली तरी चालतील बाळा, पण नापास होऊ नको!
…
गुरुजी - 'आय लव्ह यू' शब्दाचा शोध कुठे लागला?
बंड्या - चीनमध्ये
गुरुजी - कशावरून?
बंड्या - त्यात सगळे चायनीज गुण आहेत
ना कसली गॅरंटी, ना कसली वॉरंटी…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या