Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायको - काय हो, तुम्ही काल शेजारणीसोबत पिक्चर बघायला गेला होतात.
नवरा - हो! का?
बायको - मी काय मेलीय का?
नवरा - (समजावणीच्या स्वरात) अगं तुला तर माहीत आहे
आज काल सहकुटुंब बघण्यासारखे सिनेमे बनतात कुठं?
…
संत्या एका हॉटेलात गेला…
बघितलं तर हॉटेल फुल्ल!
सगळे कपल जागा धरून बसले होते.
संत्यानं फोन काढला आणि जोरात बोलला…
तुझी गर्लफ्रेंड इथं दुसऱ्या सोबत बसलीय, लवकर ये…
काय जादू झाली विचारू नका
काही क्षणांत अर्ध हॉटेल रिकामं झालं!
…
पिंकी - माझ्या बाबांनी तंबी दिलीय की नापास झालीस तर तुझं लग्न रिक्षावाल्याशी लावून देईन म्हणून…
बंड्या - अरे व्वा! माझ्या बाबांनी सांगितलंय नापास झालास तर तुला रिक्षा घेऊन देईन.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या