Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायको: नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहतं...
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा: अरे त्यात काय दाखवायचं…?
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखतंय.
--------------------------------------
चिंटू: २चा पाढा एका कागदावर लिहून
तो जाळला तर काय होईल?
मिंटू: त्याची राख तयार होते,
तिला ‘बेचिराख’ म्हणतात!
--------------------------------------
एक भिकारी देवाला म्हणतो…
हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे,
खाल्ल्यावरसुद्धा कधीच संपले नाही पाहिजे!
देव: हे घे पूर्ण एक चिंगम…
--------------------------------------
नवरा: माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…
ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव…
बायको: हो लावते, तुमच्या मोबाईलचा
पासवर्ड सांगा बरं…
नवरा: राहू दे, थोडं बर वाटतंय आता…
--------------------------------------
एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत…