Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
गुरुजी : बंड्या सांग, शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का?
बंड्या : आहे ना सर.
गुरुजी : कोणती सांग.
बंड्या : टिंब.
(गुरुजी सुट्टीवर गेले)
…
रात्री बेडरूममध्ये दोन-तीन मच्छर फिरताना दिसले.
मी उठून ऑल आउट लावणार इतक्या एक मच्छर बोलला…
भाऊ, तुमची शपथ चावणार नाही.
फक्त थोडा वेळ एसीमध्ये बसू द्या!
…
मुलगा - आई, मी लव्ह मॅरेज करणार आहे…
आई - पुन्हा असं काही बोललास तर चपलीनं तोंड फोडेन!
तुझ्या भरवशावर आजपर्यंत लोकांना खूप आहेर केलेत मी
…
लोक म्हणतात एकदा का दारू प्यायली की कायमची सवय लागते
एकदम चूक. मला हे पटतच नाही.
आम्ही लहानपणापासून अभ्यास करतोय
लागली का सवय?
याला म्हणतात मनावरचा संयम
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या