Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
नवरा-बायको फिरायला बाहेर पडतात!
कारमध्ये बसताच नवरा सीट बेल्ट लावायला लागतो
तेवढ्यात त्याची बायको नाराज होऊन म्हणते,
तुम्हाला ना, माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास नाही.
…
नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण होतं...
जवळपास एक तास सुरू असलेलं हे भांडण नवऱ्याच्या एका वाक्यात संपलं!
वाक्य होतं...
सुंदर आहेस म्हणून काहीपण बोलशील का?
त्यानंतर बायको काहीच बोलली नाही!
वर नवऱ्याला चहा आणि बिस्कीट सुद्धा दिलं!
(लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचे आहे. रोग्याशी नाही)
…
बायको आज भलतीच लाडात आलेली असते…
नवऱ्याला म्हणते,
अहो, माझ्यासाठी एक उखाणा घ्या ना…
नवरा सुरुवातीला आढेवेढे घेतो
शेवटी कसाबसा तयार होतो!
नवरा - पोतं ज्वारीचं, सुईनं उसवलं…
माझ्या बायकोनं मला पावडर लावून फसवलं!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)