Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
अकबर बिरबलाला बोलवून सगळे हालहवाल विचारतो. नंतर दरबारातील कर्मचाऱ्यांबद्दल एक प्रश्न विचारतो,
बिरबल, मला सांग. आपल्या स्टाफमध्ये सर्वात जास्त काम कोण करतो?
बिरबल - महाराज मी सगळ्यांना बोलवून आणतो, मग सांगतो.
बिरबल सगळ्यांना बोलवून आणतो आणि एकाचा हात पकडून म्हणतो, महाराज हाच आहे तो कष्टाळू माणूस
अकबर - तू कसं ओळखलंस?
बिरबल - महाराज, मी याच्या मोबाइलची बॅटरी चेक केली. ९८ टक्के आहे.
…
ऑफिसला जाताना तुम्हाला एखादा कुत्रा झोपलेला दिसला आणि
ऑफिसातून परत येतानाही कुत्रा झोपलेलाच दिसला तर
समजून जा की,
तुमची जिंदगी कुत्र्यापेक्षा वाईट आहे!
…
गर्लफ्रेंड त्यांच्या अंध बॉयफ्रेंडला म्हणते,
तुझे डोळे चांगले असते आणि तू पाहू शकला असतास तर किती बरं झालं असतं.
मी किती सुंदर आहे हे तुला कळलं असतं.
अंध प्रेमी - राहू दे गं… तू एवढी सुंदर असतीस तर डोळे असणाऱ्यांनी तुला माझ्यासाठी का सोडली असती?
मी आंधळा आहे, वेडा नाही!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या