Join pain: थंडीत 'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे वाढते सांधेदुखी, वेदनांपासून बचावासाठी करा सोपे उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Join pain: थंडीत 'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे वाढते सांधेदुखी, वेदनांपासून बचावासाठी करा सोपे उपाय

Join pain: थंडीत 'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे वाढते सांधेदुखी, वेदनांपासून बचावासाठी करा सोपे उपाय

Nov 29, 2024 07:55 PM IST

which vitamin deficiency causes joint pain marathi: हिवाळ्यात शरीर आणि सांधेदुखी वाढण्यास अनेक कारणे जबाबदार असू शकतात. ही कारणे समजून घेतली आणि प्रतिबंधक पद्धतींकडे लक्ष दिले, तर अशा समस्या वाढण्यापासून रोखता येऊ शकतात.

Home remedies for joint pain in Winter marathi
Home remedies for joint pain in Winter marathi (freepik)

Home remedies for joint pain in Winter marathi:  थंड हवामानात लोक सहसा सांधे आणि शरीर दुखण्याची तक्रार करतात. विशेषत: जर एखाद्याला सांधेदुखीसारखा आजार असेल तर त्यांच्यासाठी हिवाळा अत्यंत कठीण असतो. अशा लोकांमध्ये अगदी थंड वाऱ्याच्या झुळकानेही वेदना होतात. हिवाळ्यात शरीर आणि सांधेदुखी वाढण्यास अनेक कारणे जबाबदार असू शकतात. ही कारणे समजून घेतली आणि प्रतिबंधक पद्धतींकडे लक्ष दिले, तर अशा समस्या वाढण्यापासून रोखता येऊ शकतात. ही समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, सांधेदुखीची काही सामान्य कारणे आणि त्यांच्या बचावाशी संबंधित महत्त्वाची माहिती, चला तर मग याविषयी अधिक जाणून घेऊया...

जाणून घ्या हिवाळ्यात शरीर आणि सांधेदुखी का वाढते?

हिवाळ्यात तापमानात झालेली घसरण, बदलेले हवामान, कमी झालेली शारीरिक हालचाल, वातावरणात थंडीचा वाढलेला दाब, कमी झालेली रोग प्रतिकारशक्ती आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली व्हिटामिन्स डी ची कमतरता यामुळे थंडीत सांधेदुखीची समस्या अधिक वाढते. थंडीच्या दिवसांत व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण करून सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पुढील काही उपाय करता येतील...

शरीर उबदार ठेवा-

हिवाळ्यात उबदार राहिल्याने तुम्हाला आराम मिळतोच पण सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. उबदार कपडे घाला आणि तुमचे हात, गुडघे आणि नितंब चांगल्या प्रकारे इन्सुलेटेड आहेत याची खात्री करा. कारण या भागात वेदना सहसा सुरू होतात.अति थंडीमुळे रक्तदाबावरही परिणाम होतो. परंतु उबदार शरीरात रक्ताभिसरण सामान्य राहते. अशा प्रकारे, शरीराच्या सर्व अवयवांमध्ये पुरेसे पोषण आणि ऑक्सिजन पोहोचतो. ज्यामुळे शरीरात जडपणा आणि वेदना जाणवत नाहीत.

व्हिटॅमिन डीचे प्रमाण कायम ठेवा-

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे संधिवात वेदनांची संवेदनशीलता वाढते. हिवाळ्यात, लोकांमध्ये व्हिटॅमिन्स डी या आवश्यक जीवनसत्वाची पातळी कमी होते, कारण ते बाहेर उन्हात कमी वेळ घालवतात. त्यात भर म्हणजे अंधार लवकर पडतो आणि अर्थातच तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचे सेवन करा आणि तुम्ही सप्लिमेंट्स घेण्याचाही विचार करू शकता.परंतु, कोणताही पूरक आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

अँटी इंफ्लीमेंट्री पदार्थ खा-

हिवाळ्यात सांधेदुखी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आहारात अँटी इंफ्लीमेंट्री पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागेल. एवोकॅडो, नट, बिया आणि फॅटी फिश यांसारख्या पदार्थांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. फिश किंवा क्रिल ऑइल सप्लिमेंट्स देखील सांधेदुखीपासून आराम देण्यास मदत करू शकतात. यासाठी खालील खाद्यपदार्थ फायदेशीर ठरू शकतात-

हळद

लसूण

कांदे, विशेषतः लाल

ग्रीन टी

द्राक्षे

बेरी

दही सारखे प्रोबायोटिक पदार्थ

हिरव्या पालेभाज्या

वॉक करणे-

नियमित चालण्यामुळे तुमच्या हाडांची आणि स्नायूंची हालचाल कायम राहते. यामुळे ते कडक होत नाहीत. आणि सर्व अवयव सामान्यपणे कार्य करतात. तुमचे स्नायू बळकट केल्याने तुमच्या सांध्यावरील ताण कमी होऊ शकतो. हिवाळ्यात, बाहेर थंडीमुळे चालणे कठीण होऊ शकते. परंतु पूर्ण उबदार कपडे परिधान करून वेगाने चालणे सुरू करा. जेव्हा तुम्ही वेगाने चालता तेव्हा तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्हाला थंडीत चालणे सोपे जाते.

हायड्रेटेड रहा-

थंडीमध्ये तहान कमी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. जेव्हा शरीर निर्जलीकरण होते, तेव्हा सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होण्याची संवेदनशीलता वाढते. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner