Winter Health Tips: थंडी सुरू होताच वाढू लागते सांधेदुखी? ‘अशी’ घ्या स्वतःची खास काळजी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Health Tips: थंडी सुरू होताच वाढू लागते सांधेदुखी? ‘अशी’ घ्या स्वतःची खास काळजी!

Winter Health Tips: थंडी सुरू होताच वाढू लागते सांधेदुखी? ‘अशी’ घ्या स्वतःची खास काळजी!

Dec 05, 2024 09:27 PM IST

Winter Joint Pain : तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल आणि हिवाळ्यात सांध्यांसंबंधी तीव्र वेदना सहन करायच्या नसतील, तर या चार गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

Winter Joint Pain
Winter Joint Pain

Joint Pain Tips In Marathi : थंडीला सुरुवात होताच तुमचे सांधे दुखू लागतात. तसेच, थंड हवामानामुळे सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे आणि सांध्यांसंबंधीत वेदनांमुळे तुमच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो. जर, तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल आणि हिवाळ्यात सांध्यांसंबंधी तीव्र वेदना सहन करायच्या नसतील, तर या चार गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव म्हणतात, 'वातावरणातील हवेचा दाब कमी झाल्यामुळे स्नायू, सांधे किंवा जखमेच्या ऊतींना पटकन सूज येते आणि यामुळे वेदना वाढतात. हिवाळ्यात सांध्यांमधील द्रव अधिक घट्ट होतात आणि त्यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा येतो आणि वेदना सुरू होतात. ज्यांना संधिवाताची समस्या आहे त्यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो.हिवाळ्यात थंड हवामान आपल्या सांध्यामध्ये वेदना निर्माण करते. यामुळे तुमच्या सांध्यांमध्ये कडकपणा येऊ शकतो ज्यामुळे चालणे फिरणे कठीण होते. लोकांना गुडघे, कोपर किंवा मनगट यासारख्या विविध भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागतात. तापमानात अचानक घट झाल्यामुळे तुमच्या सांध्यातील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो, ज्यामुळे ते वेदनांबाबत अधिक संवेदनशील होतात. एखाद्याला अनेक लक्षणे दिसू शकतात. लक्षणांमध्ये सांध्यांमधील जडपणा, सूज, असह्य वेदना आणि हालचाल मंदावणे यांचा समावेश असतो ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी हिवाळ्यात तुमच्या सांध्यांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात सांधेदुखी टाळण्यासाठी टिप्स

शरीर उबदार ठेवा : हिवाळ्यात वातावरणातील थंडपणामुळे तुमच्या सांध्यांमध्ये ताठरता येऊ शकते आणि यामुळे वेदना होतात. अशा व्यक्तींना उबदार कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो जे त्यांचे सांधे उबदार ठेवण्यास मदत करतात. तुम्ही हीटिंग पॅड वापरू शकता किंवा गरम पाण्याने आंघोळ करू शकता. परंतु, पाणी जास्त गरम नसावं याची खात्री करा.  कारण, ते तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते.

Women's Health: हिवाळ्यात वाढतो योनीमार्गातील कोरडेपणा, जाणून घ्या कारण आणि उपाय

नियमितपणे व्यायाम करा : हिवाळ्यात व्यायामाची योग्य दिनचर्या राखणे उपयुक्त ठरू शकते. सांध्यांना उबदार राखण्यासाठी विविध शारीरिक क्रिया आणि व्यायाम करा. यामध्ये स्ट्रेचिंग, रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, डान्सिंग, योगा, मेडिटेशन, कार्डिओ आणि जिम यासारख्या व्यायामांचा समावेश असू शकतो. हे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि तुमचे सांधे लवचिक राखण्यास मदत करतात.

वजन नियंत्रित राखा : जास्त वजन तुमच्या सांध्यावर जास्त दाब आणू शकते, विशेषत: गुडघे, नितंब आणि पाठीच्या खालच्या भागात जास्त दाब आल्याने ते वेदनादायक ठरु शकते. वजन नियंत्रित राखणे हे केवळ तुम्हाला निरोगीच नाही, तर तुमचे सांधे मजबूत करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

आहाराकडे लक्ष द्या : हिवाळ्यात सांधेदुखीपासून बचाव करण्याची गुरुकिल्ली म्हणजे संतुलित आहाराचे सेवन. तुमच्या रोजच्या जेवणात हळद, आले आणि लसूण यांसारख्या मसाल्यांसोबत पालक, ब्रोकोली आणि रताळे यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा. सूप, मटनाचा रस्सा आणि स्टू यांसारख्या या घटकांसह विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकता, जे केवळ तुमचे सांधे मजबूत करण्यास मदत करत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदार ठेवतात.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner