Best Trekking Places in Maharashtra: महाराष्ट्र हे विविधतेने नटलेलं आहे. इथे अनेक अशा जागा आहेत जिकडे तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता. महाराष्ट्र्रातील अनेक जागा ट्रेकिंगसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात अशी अनेक लपलेली साहसी ठिकाणे (adventure trekking in Maharashtra) आहेत ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. इथे लोक उंच डोंगरावर ट्रेकिंगला जातात. पण इथे आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे जाणे खूप मोठं ऍडव्हेंचर असेल. या ठिकाणाचे नाव जीवनगड किल्ला आहे. येथून लोक ३८५ फूट उंचीवर असलेल्या जीवधन किल्ला चढण्याचा प्रयत्न करतात.
या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. नाणेघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहिला दरवाजा मिळेल, त्याला कल्याण दरवाजा म्हणतात. तर दुसरा दरवाजा घाटघर गावातून जाणाऱ्या रस्त्याकडे आहे. ते जुन्नर गेट म्हणून ओळखले जाते. पण या गडाच्या या दोन दरवाजांवर जाण्यासाठी तुम्हाला खडक ओलांडून जावे लागेल. या कारणास्तव जीवधन किल्लाचा ट्रेक करणे सर्वात कठीण मानले जाते.
नाणेघाट ते वानरलिंगी खडकापर्यंतचा रस्ता जंगलातून जातो. या जंगलाच्या वाटेने तुम्ही ३०० फूट उंच खडकावर पोहोचू शकता.तिकडे तुम्हाला चढायला पायऱ्याही आहेत ज्या खडक कापून बनवल्या गेल्या आहेत.
इथली सर्वात साहसी गोष्ट म्हणजे या उंच शिखरावर पोहोचल्यानंतर लोक वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग करणे. पर्यटक स्लिंग दोरीच्या साहाय्याने एका खडकावरून दुसऱ्या खडकापर्यंत पोहोचतात.
जीवधन किल्ला ट्रेक करण्यासाठी आधी घाटघर गाठावे लागते. जर तुम्ही लोकल ट्रेनने येत असाल तर तुम्हाला कल्याण स्टेशन गाठावे लागेल. ते मुंबई, पुणे आणि ठाणे जवळ आहे. येथे तुम्हाला टोकावडा गावात पोहोचावे लागेल. यानंतर तुम्ही ऑटोरिक्षाने नाणेघाटला पोहोचू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)