Things to Keep Mind While Wearing Saree: अनंत-राधिकाच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या लग्नात आलेल्या स्टार्सचा लूक चांगलाच व्हायरल झाला होता. पण ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या लग्नानंतर सतत ट्रोल होत आहेत. जया बच्चन लाल आणि काळ्या रंगाची साडी नेसून आणि हेवी दागिन्यांनी सजून या लग्नात पोहोचल्या होत्या. जया बच्चनचा लूक खूप चांगला होता. मात्र, ही साडी नेसून त्या उप्स मूव्हमेंटच्या शिकार झाल्या. जयाजींनी आपल्या साडीचा पदर नीट पिनअप केला नाही. ज्यामुळे तो आपल्या जागेवरून निघून खाली पडला होता. या उप्स मूव्हमेंटमुळे त्यांना सतत ट्रोल केले जात आहे. तुम्हीही साडी नेसत असाल तर येथे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवा.
साडी नेसण्यासाठी प्लीट्स आवश्यक आहेत. प्लीट्स नेहमी जागेवर असावेत आणि हलू नये. हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्लीट्स जागेवर ठेवण्यासाठी सेफ्टी पिन वापरणे. प्लीट्स सिक्योर ठेवण्यासाठी दोन पिन लावा, एक वरच्या बाजूला आणि एक मध्यभागी. असे केल्याने प्लीट्स निघण्याची किंवा सुटण्याची शक्यता कमी असते.
कापड कोणताही ड्रेस सुंदर बनवू किंवा खराब करू शकतो. साडीमध्ये बेस्ट दिसायचे असेल तर योग्य फॅब्रिक निवडा. असे कापड निवडा जे तुमच्या कर्व्हजला हायलाइट करेल आणि तुमच्या शरीराच्या आकारानुसार असेल. सिल्क, कॉटन आणि शिफॉन हे असे फॅब्रिक आहेत जे हलके असतात आणि शरीराच्या सर्व प्रकारांवर आकर्षक दिसतात.
साडी उंच किंवा खूप खाली होऊ नये म्हणून साडी नेसण्यापूर्वी फूटवेअर घाला. बहुतेक महिलांना हाय हील्स घालायला आवडतात. त्यामुळे साडी नेसण्यापूर्वी फूटवेअर घालायला विसरू नका.
साडी नेसताना जास्त सेफ्टी पिन लावणं आवडत नसेल तर सुई धाग्याचा वापर करा. सेलिब्रिटी साडी ड्रेसर देखील साडी सिक्योर ठेवण्यासाठी सुई-धाग्याचा वापर करतात. यामुळे साडी नीट बसते आणि आकर्षक दिसते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या