Tips to Decorate Bal Gopal Idol: श्रीकृष्ण भक्तांसाठी जन्माष्टमीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिंदू पंचागनुसार जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. बाळ गोपाळाच्या रूपाची सेवा करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जन्माष्टमीचा सण अधिकच खास असतो. खरं तर बाळ गोपाळ हा घरातल्या मुलासारखा असतो, ज्याची सेवाही मुलासारखी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. जो कृष्णभक्त जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. त्यामुळेच या दिवशी बाळ गोपाळचे सुंदर श्रृंगार केला जातो. तुम्हालाही आपल्या घरातील बाळ गोपाळ अतिशय सुंदर पद्धतीने सजवायचे असतील तर या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. या टिप्स फॉलो करून बाळ गोपाळचा श्रृंगार कराल तर सगळे कौतुक करतील.
बाळ गोपाळाचा श्रृंगार करण्यापूर्वी त्याच्या मूर्तीला तुळशीच्या पान आणि गंगा जलने स्नान घालावे. यानंतर त्यांना पंचामृताने स्नान करून स्वच्छ पाण्याने स्नान करावे. बाळ गोपाळाला आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून त्यांचा श्रृंगार करावा.
बाळ गोपाळाला अंघोळ घातल्यानंतर त्याच्या अंगावर अत्तर लावा. नंतर त्याला स्वच्छ आणि नवीन कपडे घाला. जन्माष्टमीच्या दिवशी भगवे, पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घाला. हे रंग शुभ मानले जातात.
बाळ गोपाळला सुंदर कपडे परिधान केल्यानंतर डोक्यावर रत्न-मोती जडलेला मुकुट घाला. मुकुटावर मोरपंख लावायला विसरू नका. त्यानंतर कान्हान्या कानात कुंडल, गळ्यात रत्न-मोत्यांचा हार, हातात बाजूबंद, कंबरपट्टा किंवा पायल घालावी.
बाळ गोपाळच्या कपाळावर केशर किंवा चंदनाचे तिलक लावा. चंदन आणि केशर यांचे मिश्रण बनवून त्यांच्या शरीरावर हलके लावू शकता.
बाळ गोपाळच्या गळ्यात आणि मुकूटावर ताज्या फुलांची माळ घाला. यासाठी मोगरा, झेंडू आणि गुलाबाची फुले वापरू शकता. यानंतर बाळ गोपाळला पाळण्यात बसवून रंगीबेरंगी मोती आणि फुलांनी पाळणा सजवावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)