Health Benefits of Makhan Mishri: कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या दिवशी बाळ गोपाळला प्रसाद म्हणून माखन मिश्री नक्की अर्पण केली जाते. कान्हाला माखन मिश्री खूप आवडते. पण कान्हाचा हा आवडता प्रसाद खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे का? विशेषत: मुलांना ते खायला घातले तर ते खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदात लोणी आणि खडी साखर एकत्र खाल्ल्याने शरीराला ४ फायदे होतात, असे म्हटले आहे. चला तर मग जाणून घ्या माखन मिश्री खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात.
आयुर्वेदानुसार लोणी खाल्ल्यास शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. ज्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारच्या आजारांशी लढण्याची ताकद मिळते. हे खाल्ल्याने आजारांपासून व्यक्तीचे संरक्षण होते.
आयुर्वेदात लोणी त्वचेसाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. रोज याचे सेवन केल्यास त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो.
लोणी हाडांच्या सांध्यांना नैसर्गिक वंगण किंवा लुब्रिकेंट देते. ज्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवत नाहीत. हे हाडांसाठी, सांध्यासाठी खूप फायदेशीर आहे.
ज्या लोकांच्या शरीरात शक्तीची कमतरता असते किंवा ज्यांना आपले वजन वाढवायचे असेल त्यांनी माखन मिश्री खावी. आयुर्वेदात याला बलवर्धक असे म्हणतात. हे नियमित खाल्ल्याने शरीर मजबूत होते.
माखन मिश्री कूलिंग एजंटसारखे काम करते. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. शरीरातील उष्णतेमुळे पित्त वाढते, ज्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. माखन मिश्री शरीराला थंडावा देते.
लहान मुलांना माखन मिश्री खायला दिल्यास शरीरातील शक्ती वाढते आणि मुलांची वाढ चांगली होते. त्याचबरोबर माखन मिश्री हे मेंदू तीक्ष्ण करण्यास मदत करते. त्यामुळे माखन मिश्रीला मुलांसाठी अमृत म्हटले आहे.
माखन म्हणजेच लोणी खाण्यासाठी धाग्याची खडी साखर म्हणजेच साखरेची गाठी फक्त ५ ग्रॅम घ्या. जेणेकरून ते शरीराला हानी पोहोचवणार नाहीत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)