Janmashtami 2024: जन्माष्टमीला लेकीला राधेचा लूक देताय? 'या' टिप्स करा फॉलो, दिसेल एकदम परफेक्ट-janmashtami 2024 tips on how to do radha look and makeup for girls ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Janmashtami 2024: जन्माष्टमीला लेकीला राधेचा लूक देताय? 'या' टिप्स करा फॉलो, दिसेल एकदम परफेक्ट

Janmashtami 2024: जन्माष्टमीला लेकीला राधेचा लूक देताय? 'या' टिप्स करा फॉलो, दिसेल एकदम परफेक्ट

Aug 24, 2024 03:15 PM IST

Gokulashtami Radha Look and Makeup: जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते.

Janmashtami 2024 Radha Look:
Janmashtami 2024 Radha Look:

Janmashtami Radha Look: श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा हा सण २६ ऑगस्टला साजरा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. कान्हाचे भक्त जन्माष्टमीनिमित्त घरातील लहान मुलांना राधा-कृष्णाच्या रूपात सजवतात. तुम्हालाही या जन्माष्टमीला तुमच्या लाडक्या लेकीला राधा राणीच्या रुपात सजवायची इच्छा असेल, तर या मेकअप टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.

लेहेंगा-

जन्माष्टमीचा सण खास बनवण्यासाठी लहान मुलींना राधा राणीचा पारंपरिक पोशाख लेहेंगा परिधान केला जातो. यासाठी तुम्हाला हिरवा, लाल, गुलाबी किंवा पिवळा असे भडक रंग उठून दिसू शकतात. लेहेंग्यावर केलेल्या वर्कबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला मिरर एम्ब्रॉयडरी किंवा सिक्विन वर्क असलेला लेहेंगा आवडू शकतो. तर लेहेंगाच्या चोळीमध्ये विविध डिझाइन्स मिळू शकतात. लक्षात ठेवा, जर लेहेंगा खूप साधा असेल तर तुम्ही त्यासोबत भरलेली ओढणी घेऊ शकता आणि जर लेहेंगा आधीच जड असेल तर तुम्ही कोणतीही साधी ओढणी मुलींना घेऊ शकता.

मेकअप-

आपल्या मुलीला कृष्णाची प्रेयसी राधा म्हणून सजवताना, तिच्या चेहऱ्यावर लावलेल्या मेकअपची विशेष काळजी घ्या. मुलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते आणि मेकअपमध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. अशा परिस्थितीत राधा राणीसारखा मेकअप करण्यासाठी मुलांच्या त्वचेवर जास्त मेकअप करू नका. मेकअप करण्यापूर्वी, त्वचेवर बेबी मॉइश्चरायझर अवश्य लावा.

राधा दिसण्यासाठी मेकअप कसा करायचा?

गोकुळाष्टमीच्या दिवशी मुलीला राधेचे रूप देण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर हलका फाउंडेशन लावा आणि तिच्या ओठांवर लाल लिपस्टिक लावा आणि तिच्या गालावर रंग आणि चमक लावा. केसांमध्ये गजरा माळा. जर आपण डोळ्यांच्या मेकअपबद्दल बोललो तर काजळ आणि मस्करा काही प्रमाणात लावता येईल.

राधेच्या लुकसाठी ॲक्सेसरीज-

जन्माष्टमीला मुलीला राधेचे रूप देण्यासाठी, माथा पट्टी किंवा मांग टिक्का घालावा. गळ्यात मोत्यांचा हार घाला. कानात फार जड झुमके वापरू नका. यानंतर मुलीला पैंजण, कानातले, बांगड्या, अशा सर्व गोष्टी घालायला लावा. कपाळावर टिकली लावायला अजिबात विसरू नका.

टिपऱ्या-

टिपऱ्या हातात धरल्याशिवाय तुमच्या लेकीचा जन्माष्टमीचा मेकअप पूर्ण होऊच शकत नाही. अशा परिस्थितीत, आपल्या मुलीला राधा राणी म्हणून सजवल्यानंतर, तिच्या हातात दांडिया आहेत का एकदा पाहा.

मेंदीऐवजी अल्ता वापरा-

तुमचे मूल शाळेत गेले तर तिला राधा राणीचे रूप देण्यासाठी तिच्या हातावर मेहंदी ऐवजी अल्ता लावा. असे केल्याने फंक्शननंतर अल्ता सहज धुता येते.