Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या निमित्ताने बाळकृष्णाचा आवडता पदार्थ 'पंजिरी' बनवताय? ‘या’ प्रकारे देऊ शकता ट्विस्ट!-janmashtami 2024 special panjiri recipe must try this dhaniya panjiri recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या निमित्ताने बाळकृष्णाचा आवडता पदार्थ 'पंजिरी' बनवताय? ‘या’ प्रकारे देऊ शकता ट्विस्ट!

Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या निमित्ताने बाळकृष्णाचा आवडता पदार्थ 'पंजिरी' बनवताय? ‘या’ प्रकारे देऊ शकता ट्विस्ट!

Aug 26, 2024 12:03 PM IST

Panjiri Recipe: जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी पंजिरी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. पण, या वर्षी काही तरी नवीन ट्राय करायचं असेल तर, पंजिरीला 'या' प्रकारे ट्विस्ट देऊ शकता.

जन्माष्टमी पर 3 तरह से बनाएं पंजीरी
जन्माष्टमी पर 3 तरह से बनाएं पंजीरी (Shutterstock)

Janmashtami 2024 Special Panjiri Recipe: जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यापैकीच एक म्हणजे पंजिरी. गव्हाचे पीठ, कोथिंबीर, बेसन, नारळ अशा अनेक गोष्टींपासून पंजिरी बनवता येते. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पंजिरी कशी बनवायची ते सांगणार आहोत. यावेळी तुम्ही पंजिरीला खास ट्विस्ट देखील देऊ शकता. पंजिरी हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ आहे. कृष्णाला अर्पण करण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये पंजिरी आवर्जून घातली जाते. जाणून घेऊया पंजिरी बनवण्याच्या काही खास रेसिपी...  

पारंपारिक पंजिरी रेसिपी

पारंपारिक पद्धतीने पंजिरी बनवण्यासाठी एका कढईत पीठ घालून कोरडे भाजून घ्यावे. पीठ मंद आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. नंतर त्यात तूप घालून तूप शोषून घेईपर्यंत पीठ ढवळत राहावे. पीठाने तूप शोषून घेतल्यावर त्यात भाजलेले काजू, मनुका आणि बदाम घालावे. नंतर संपूर्ण मिश्रण व्यवस्थित भाजले जाईपर्यंत ढवळा. आता गॅस बंद करून त्यात पिठी साखर घाला.

धण्याची पंजिरी बनवण्यासाठी साहित्य: 

- १ कप धणे

- १/४ कप साखर

- १/२ कप बदाम

- १/२ कप काजू

- १/२ कप पिस्ता

- १/४ कप वेलची पावडर

- १/४ कप सुंठ पावडर

- १ मोठा चमचा तूप

 

धण्याची पंजिरी बनवण्याची कृती: 

१. एका पॅनमध्ये धणे सुंगध येईपर्यंत भाजून घ्या.

२. यात तुमच्या आवडीचे बदाम, काजू आणि ड्रायफ्रूट्स घाला आणि ते हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.

३. नंतर यात वेलची पावडर आणि सुंठ पावडर घाला आणि मिश्रण नीट ढवळून घ्या.

४. यात गरजेनुसार थोडे तूप घाला.

५. आता तुमची पंजिरी जन्माष्टमीच्या नैवेद्यात श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी तयार आहे.

 

‘हे’ लक्षात ठेवा!

- धणे जळू नयेत, म्हणून मंद आचेवर भाजून घ्या.

- सगळे घटक एकसारखे भाजले जावेत म्हणून ते सतत ढवळत राहा.

 

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी रविवार, २५ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ०३.३९ वाजता सुरू झाली आहे आणि सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री २.१९ वाजता समाप्त होईल. त्या आधारे २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.