Janmashtami Recipe: कृष्ण जन्माष्टमीला प्रसादासाठी बनवा मथुरेचा पेडा, खूप सोपी आहे रेसिपी-janmashtami 2024 how to make mathura peda recipe for prasad or bhog ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Janmashtami Recipe: कृष्ण जन्माष्टमीला प्रसादासाठी बनवा मथुरेचा पेडा, खूप सोपी आहे रेसिपी

Janmashtami Recipe: कृष्ण जन्माष्टमीला प्रसादासाठी बनवा मथुरेचा पेडा, खूप सोपी आहे रेसिपी

Aug 23, 2024 01:31 PM IST

Prasad or Bhog Recipe: जन्माष्टमीला तुम्ही प्रसादासाठी मथुराचे पेडे बनवू शकता. हे खायला खूप चविष्ट तर असतातच, पण बनवायलाही खूप सोपे असतात. जाणून घ्या याची रेसिपी

मथुरेचा पेडा
मथुरेचा पेडा

Mathura Peda Recipe: देशभरातील कान्हाचे भक्त २६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणार आहेत. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म याच दिवशी झाला होता. जो जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी अनेक वस्तूंचा प्रसाद तयार केला जातो. जर तुम्हालाही आपल्या घरी भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मथुरा पेड्याचा प्रसाद तयार करा. कान्हाच्या भक्तांना मथुरा पेड्याची चव नक्कीच माहीत असेल. मथुरेचा पेढे खायला खूप चविष्ट तर असतातच, पण बनवायलाही खूप सोपे असतात. चला तर मग जाणून घेऊया प्रसादासाठी घरी मथुरेचा पेडा कसा बनवायचा.

मथुरा पेडा बनवण्यासाठी साहित्य

- खवा - ५०० ग्रॅम

- बूरा - ५०० ग्रॅम

- तूप - २ किंवा ३ चमचे

- दूध - अर्धा कप

- छोटी वेलची - ८-१० बारीक केलेली

मथुरा पेडा बनवण्याची पद्धत

घरी मथुरेचा पेडा बनवण्यासाठी प्रथम कढईत खवा भाजून घ्यावा. खवा भाजताना विशेष काळजी घ्या की भाजताना त्यात मध्ये मध्ये थोडे तूप किंवा दूध घालत रहा. खवा तपकिरी होईपर्यंत नीट भाजून घ्या. यानंतर भाजलेला खवा एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवावा. खवा थंड झाल्यावर त्यात २ कप बुरा, बारीक केलेली वेलची घाला. हे मिश्रण पेडा तयार करण्यासाठी तयार आहे. आता उरलेला बुरा एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा. गोल तयार केलेला पेडा या बुरामध्ये कोट करा. 

तुमचे चविष्ट मथुरेचे पेडा कान्हाला प्रसादासाठी अर्पण करायला तयार आहेत. हे पेडे खुल्या पंख्याच्या हवेत २-३ तास ठेवून हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावीत.