Tips for Dressing Your Son Like Lord Krishna: देशभरात दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म याच दिवशी झाला होता. जो कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. हिंदू पंचांगनुसार यावर्षी जन्माष्टमी २६ ऑगस्ट, सोमवारी साजरी केली जाईल. या दिवशी अनेक कुटुंबातील लोक आपल्या लहान मुलांना कान्हा आणि राधा सारखं सजवतात. जर तुम्हालाही या जन्माष्टमीला आपल्या मुलाला कान्हाचा लूक द्यायचा असेल पण तुम्ही थोडे कंफ्यूज असाल की कसं तयार करावं तर तर या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या मुलाला कान्हा लुक देऊ शकता.
मुलाला कान्हा लूक देण्यासाठी आधी धोतर काळजीपूर्वक निवडा. धोतर किंवा धोती हा एक पारंपारिक ड्रेस आहे, जो कान्हा सुद्धा नेसायचे, असे मानले जाते. मुलाला कृष्णा लुक देण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या साइजचे धोतर खरेदी करा. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचे धोतर बाजारातून खरेदी करू शकता. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही रंगाचे कॉटन किंवा सिल्क धोतर घालू शकता.
मोरपंखाशिवाय श्रीकृष्णाचे रूप अपूर्ण आहे. अशा वेळी आपल्या मुलाला कृष्णरूप देण्यासाठी त्याच्या साइजचा मोरपंख असलेला मुकुट खरेदी करा. हे तुम्हाला भाड्याने सुद्धा सहज मिळेल. क्लिपच्या मदतीने तुम्ही हा मुकुट तुमच्या मुलाच्या केसांना लावू शकता.
श्रीकृष्णाचे नाव मुरलीधर सुद्धा आहे. कारण त्यांच्या एका हातात नेहमी बासरी असायची. आपल्या मुलाला कान्हासारखा लूक देण्यासाठी त्याच्या धोतरसोबत बासरी अवश्य लावा. या बासरीला तुम्ही रंगीबेरंगी लेसने सजवू शकता. ही बासरी तुम्ही मुलाच्या हातात सुद्धा देऊ शकता.
श्रीकृष्णाच्या कपाळावर नेहमीच टिळा असतो. मुलाच्या कपाळावर लाल आणि पांढऱ्या रंगाचे तिलक लावू शकता.
भगवान श्रीकृष्णाच्या छायाचित्रांमध्ये त्यांनी अलंकार घातलेले तुम्ही पाहिले असेल. अशा परिस्थितीत मुलाला कान्हाचा लूक देण्यासाठी त्याच्या दागिन्यांमध्ये कानात कुंडल, कंगन, पायल, गळ्यात हार, आणि बाजूबंद सारख्या गोष्टींचा समावेश करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)