Jackie Shroff Birthday: जॅकी श्रॉफने सांगितलेल्या हेल्दी रेसिपी झाल्या इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही ट्राय केल्यात का?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Jackie Shroff Birthday: जॅकी श्रॉफने सांगितलेल्या हेल्दी रेसिपी झाल्या इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही ट्राय केल्यात का?

Jackie Shroff Birthday: जॅकी श्रॉफने सांगितलेल्या हेल्दी रेसिपी झाल्या इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही ट्राय केल्यात का?

Feb 01, 2024 01:02 PM IST

Jackie Shroff Recipe Viral: लोकप्रिय स्टार जॅकी श्रॉफ सध्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांनी शेअर केलेल्या भाज्यांच्या रेसिपी इंटरनेटवर व्हायरल होतात. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या हेल्दी भाज्यांच्या रेसिपी.

जॅकी श्रॉफने सांगितलेल्या भाज्यांची रेसिपी
जॅकी श्रॉफने सांगितलेल्या भाज्यांची रेसिपी

Healthy Recipes Shared by Jackie Shroff: सर्वांचे लाडके जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ८० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट गाजले. वास्तविक त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ॲक्शन हिरो म्हणून केली होती. पण रोमँटिक हिरो म्हणूनही ते पसंतीस उतरले. आजसुद्धा जॅकी श्रॉफ फॅन्समध्ये चर्चेत असतात. आजकाल ते आपले हिडन कुकिंग स्किल्समुळे चर्चेत आहेत. त्यांनी दिलेल्या ४ रेसिपी जाणून घ्या. या तुम्ही सुद्धा सहज ट्राय करू शकता.

वांग्याचे भरीत

जॅकी श्रॉफने सांगितलेली वांग्याच्या भरीतची रेसिपी अगदी सोपी आहे. हे बनण्यासाठी वांगी नीट धुवा आणि नंतर बाजूंनी कापून घ्या. नंतर त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या घाला. कढईत किंवा गॅसवर चांगले भाजून घ्या. नंतर वांग्याची साल काढून मॅश करा. मॅश केल्यानंतर त्यात एक चमचा मोहरीचे तेल आणि मीठ घालून मिक्स करा आणि खा.

भोपळ्याची रेसिपी

जॅकी श्रॉपने भोपळ्याची सर्वात सोपी रेसिपी सांगितली आहे. हे बनवण्यासाठी भोपळ्याचे चौकोनी तुकडे करा. नंतर कढई गरम करून त्यात बडीशेप आणि जिरे टाका. तडतडल्यानंतर त्यात भोपळा घाला. त्यावर चिरलेली मिरची टाका. झाकण ठेवून शिजवा आणि नंतर मीठ घाला. हे लक्षात ठेवा की ते चमच्याने मिक्स करू नये. आवडत असेल तर कढीपत्ताही घालू शकता.

अंडा करी पत्ता

जॅकी श्रॉफने अंडा करी पत्ताची रेसिपी शेअर केली आहे. हे बनवण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि पॅन गॅसवर ठेवा. कढईत थोडे तेल टाकून त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून तडतडू द्या. नंतर हा तडका अंड्यात टाका आणि ताबडतोब पॅनमध्ये टाका. नंतर ते चांगले भाजून घ्या. शिजवल्यानंतर त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर टाकता येते.

कांदा भेंडी

भेंडीची वेगळी भाजी बनवण्यासाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. हे बनवण्यासाठी कांदा चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर भेंडीचे मोठे चौकोनी तुकडे करा. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा आणि भेंडी घाला. मिक्स न करता शिजवा. नीट शिजल्यावर मीठ घालावे. भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Whats_app_banner