Over Sleeping: जास्त झोपणे हे आजाराचे लक्षण आहे का? पाहा ओव्हर स्लीपिंग टाळण्याचे ट्रिक्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Over Sleeping: जास्त झोपणे हे आजाराचे लक्षण आहे का? पाहा ओव्हर स्लीपिंग टाळण्याचे ट्रिक्स

Over Sleeping: जास्त झोपणे हे आजाराचे लक्षण आहे का? पाहा ओव्हर स्लीपिंग टाळण्याचे ट्रिक्स

Published Sep 06, 2023 11:10 PM IST

Sleeping Too Much a Symptom of Disease: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आणि शरीराला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. पण काही लोक खूप जास्त झोपतात. पण हे एखाद्या आजाराचे लक्षण आहे का?

ओव्हर स्लीपिंग टाळण्यासाठी ट्रिक्स
ओव्हर स्लीपिंग टाळण्यासाठी ट्रिक्स (unsplash)

Tricks to Avoid Over Sleeping: दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येक जण आरामदायी झोप शोधत असतो. यामुळे थकवा तर दूर होतोच, पण दुसऱ्या दिवशी तुमचे शरीरही फ्रेश होते. आपल्या सर्वांना माहित आहे की झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जास्त झोपणे हे देखील एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. जाणून घ्या.

या आजाराची आहेत लक्षणे

अतिनिद्रा म्हणजे हायपरसोमनिया याने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी जास्त झोपणे हे खरं तर एक वैद्यकीय विकार आहे. या स्थितीमुळे लोकांना दिवसभर झोप येते, जे सहसा थोडीशी डुलकी घेतल्याने आराम मिळत नाही. हायपरसोमनिया असलेल्या लोकांना अनेकदा चिंता, कमी ऊर्जा आणि स्मरणशक्तीची समस्या जाणवते.

जास्त झोपणे हे अनेक आरोग्य समस्यांशी निगडीत आहे, जसे की

- टाइप २ मधुमेह

- हृदयरोग

- लठ्ठपणा

- नैराश्य

- डोकेदुखी

जास्त झोपल्याने आजार होतात का?

बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की, जास्त झोपेमुळे आजार होतो की ते विद्यमान स्थितीचे लक्षण आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला तर जर तुम्ही नेहमी झोपण्याचा किंवा डुलकी, नॅप घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे.

ओव्हर स्लीपिंग टाळण्यासाठी ट्रिक्स

- ओव्हर स्लीपिंग टाळण्यासाठी झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. हे तुमच्या शरीराला स्वतःचे वेळापत्रक तयार करण्यात मदत करू शकते. ज्यामुळे तुम्हाला जास्त किंवा खूप कमी झोपणे टाळण्यास मदत होते.

- झोपण्यासाठी वातावरण तयार करणे चांगले. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर खोलीत अंधार असल्याची खात्री करा. खोलीचे तापमान देखील योग्य ठेवा, जर ते खूप गरम किंवा खूप थंड असेल तर तुम्हाला चांगली झोप येत नाही.

- वीकेंडला झोपणे कधी कधी मिनी-व्हॅकेशनसारखे वाटू शकते. हे आपल्या झोपेच्या रूटीन आणि आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

- तुम्ही दिवसभर ज्या पद्धतीने जेवता ते तुमच्या झोपेला मदत करू शकते किंवा अडथळा आणू शकते. अशा स्थितीत अशा गोष्टी दिवसभर खाव्यात जेणेकरून तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतील. पौष्टिकतेने समृध्द अन्न खाल्ल्याने तुमच्या मेंदूला झोप राखण्यासाठी आवश्यक न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करते.

 

- व्यायामामुळे मनाचा ताण कमी होतो आणि तुमचा मूड संतुलित होतो. ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीला चांगली झोप मिळू शकते. दिवसा व्यायाम करून, तुम्ही तुमचे शरीर रात्री गाढ झोपेसाठी तयार करता.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner