आता पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे गरमगरम वडापाव, बटाटे भजी, फ्रेंच फ्राईज, बटाटा पॅटीस, बटाटा पराठा यावर अनेकजण ताव मारतात. या दिवसांमध्ये जवळपास रोजच बटाटा खाल्ला जातो. पण हा बटाटा खाणे शरीरासाठी कितपत योग्य आहे? बटाट्याच्या सेवनाने शरीरावर परिणाम तर होत नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया याविषयी.
हैदराबाद यशोदा हॉस्पिटल्स जनरल फिजिशियन व डायबेटोलॉजिस्ट, सल्लागार डॉ. रंगा संतोष कुमार यांनी नुकताच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बटाटा खाणे शरीरासाठी चांगले असते की नाही हे सांगितले आहे. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. हे शरीरासाठी हानिकारक असल्याचे मानले जाते. तर काही घटक हे शरीरासाठी फायदेशीर देखील असतात. बटाटा हा फायबरचा चांगला स्रोत आहे. हे फायबर पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे बटाट्याचे सेवन करावे पण किती प्रमाणात करावे ही माहिती असायला हवे.
Pet Dog handling Tips: घरी पाळीव श्वान आणताय? मग 'या' पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा
बटाट्यामध्ये पोटॅशियमसुद्धा असतात. पोटॅशियम एक खनिज आहे. ते शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि स्नायूंना कार्य करण्यास प्रोत्साहन देते. तसेच बटाट्यामध्ये लोह, जीवनसत्त्व क व जीवनसत्त्व बी-६ देखील असतात. ही सर्व जीवनसत्वे शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामुळे बटाट्याचे सेवन करणे शरीरासाठी चांगले मात्र योग्य प्रमाणात.
वाचा: जलतरणपटूंना होऊ शकते कानाच्या संसर्गाची समस्या, जाणून घ्या काय आहे स्वीमर्स इयर आजार
बटाटा हा शरीरासाठी चांगला असतो. पण ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा लठ्ठपणा आहे त्यांनी बटाट्याच्या सेवनाबाबतीत अधिक जागरुक असायला हवे. कारण बटट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. ते शरीरात असलेल्या साखरेच्या पातळीत वाढ करतात. त्यामुळे बटाटा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या...
वाचा: हरभऱ्यामध्ये लवकर किड लागते का? यापासून बचाव करण्यासाठी ट्राय करा हे घरगुती उपाय
बटाटे आरोग्यदायी पद्धतीने (भाजलेले, उकडलेले, हवेत तळलेले) असतील आणि त्याचे माफक प्रमाणात सेवन केल्यास, ते दररोज संतुलित आहाराचा भाग बनू शकतात. पण, मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास प्राधान्य द्यावे. लक्षात ठेवा, या अष्टपैलू बटाट्याचे पौष्टिक फायदे जास्तीत जास्त वाढविण्यासाठी त्यांचे माफक प्रमाणात आणि निरोगी पदार्थांसह सेवन करणे आवश्यक आहे.”