Tea Side Effects: पोटात सूज येणे, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि...; अति उकळलेला दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tea Side Effects: पोटात सूज येणे, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि...; अति उकळलेला दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक!

Tea Side Effects: पोटात सूज येणे, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि...; अति उकळलेला दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक!

Dec 06, 2024 11:35 AM IST

Overboiling Milk Tea Side Effects: अति उकळलेला दुधाचा प्यायल्याने आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात? हे जाणून घेऊयात.

अति उकळलेला दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक!
अति उकळलेला दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक!

Overboiling Milk Tea Harmful for Health: चहाप्रेमी दिवसातून अनेकवेळा चहाची चुस्की घेतात. अनेकजण सकाळची सुरुवात आणि संध्याकाळचा थकवा दूर करण्यासाठी चहावर अवलंबून असतात. भारतीय कुटुंबांमध्ये घरात पाहुणे आले की, प्रथम त्यांना चहा दिला जातो. अनेकांना अति उकळलेला चहा प्यायला आवडतो, पण त्याचे दुष्परिणाम क्वचितच लोकांना माहिती असेल.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हणजेच आयसीएमआरने दुधाच्या चहाबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार,  मूळात दुधाच्या चहाचे सेवन केल्याने शरिरातील लोह निर्मितीत अडथळा येतो. एवढेच नव्हेतर, अति उकळलेला दुधाचा चहा प्यायल्याने प्यायल्याने यकृत आणि हृदयावरही वाईट परिणाम होतो. जास्त वेळ उकडलेला चहा प्यायल्याने एखाद्या व्यक्तीचा बीपी वाढू शकतो. चहा बराच वेळ उकळला किंवा अनेकवेळा गरम करून प्यायल्याने रक्तदाबही वाढतो.

अति उकळलेला चहा प्यायल्याचे दुष्परिणाम 

  • हाडे आणि दातांशी संबंधित समस्या: जे लोक जास्त प्रमाणात चहाचे सेवन करतात, त्यांना हाडे आणि दातांशी संबंधित समस्या अधिक असतात. इतकेच नाहीतर अति कडक चहा प्यायल्याने अॅनिमियाची समस्याही उद्भवू शकते. जेव्हा आपण दुधाचा चहा जास्त उकळतो, तेव्हा आपण त्यामध्ये आढळणारे सर्व आवश्यक अँटीऑक्सिडंट्स निघून जातात. दुधाचा चहा जितका जास्त उकळतो, तितके त्याचे स्टिक गुणधर्म वाढतात, जे पचण्यास जड असतात.
  • तणाव दूर करणारे गुणधर्म दूर होतात: अति उकळल्याने त्यात असलेले थिफ्लेविन आणि कॅटेचिनसारखे सर्व तणाव कमी करणारे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म दूर होतात. याशिवाय, चहा जास्त वेळ उकळून प्यायल्यास त्यात एसटीचा गुणधर्म वाढतो, ज्यामुळे पचायला त्रास होतो आणि चहाला कडू चव येते.
  • पचनाच्या समस्या: अति चहा प्यायल्याने पचनाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, अशा चहाच्या अतिसेवनामुळे प्रथिनांच्या संरचनेत बदल झाल्यामुळे पोटात सूज येणे, गॅस, वेदना, अॅसिडिटी सारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. दुधाचा चहा सतत उकळत राहिल्याने चहामध्ये असलेले टॅनिन कडक होतात, ज्यामुळे पचायला त्रास होतो.
  • महत्त्वाचे: सर्वसाधारणपणे, दुधाच्या चहाचे अधूनमधून अतिउकळणे धोकादायक असण्याची शक्यता नसते. परंतु, सतत असे केल्याने त्याचे पौष्टिक फायदे कमी होऊ शकतात आणि शरिरावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी, दुधाचा चहा दीर्घकाळ उकळणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner