Drinking milk tea in empty stomach: चहा आणि भारतीयांचे अनोखे नाते आहे. भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. अनेक जण दिवसातून फक्त एकदा नाही तर अनेक वेळा चहा पितात. पण तुम्हाला माहीत आहे का, चहा पिण्याची एक वेळ आणि नियम आहे. जे काही मोजक्याच लोकांना माहीत आहे. अनेक भारतीय सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन करतात. रिकाम्या पोटी चहा पिणे योग्य आहे की नाही याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे पोटात अॅसिडिटी आणि अपचन सारख्या समस्या निर्माण होतात.
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आरोग्याचे नुकसान होत नाही. चहा तुमच्या शरीरातील पोषक तत्व टिकवून ठेवण्याचे काम करतो. पण ज्यांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी चहा अधिक धोकादायक ठरू शकतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने दातांना इजा होते. दात किडणे आणि हिरड्यांचा त्रास रिकाम्या पोटी चहा पिल्याने होतो. याशिवाय चहा प्यायल्याने लघवीला त्रास होऊ शकतो. चहा तुम्हाला डिहायड्रेटही करू शकतो.
सकाळी चहा पिण्याची सवय आजकाल प्रत्येकालाच आहे. पण लक्षात ठेवा की रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा. यासाठी तुम्ही सकाळी हलका नाश्ता करा आणि मगच चहा घ्या. पोटाची समस्या असल्यास चहामध्ये दूध आणि साखर कमी घालून प्या. सकाळी दुधाचा चहा पिण्याऐवजी तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी पिऊ शकता. या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे करूनही जर तुम्हाला रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानंतर तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)