HMPV कोरोना इतकाच भयानक? आजारावर लस उपलब्ध आहे का? आरोग्य तज्ज्ञाने दिली माहिती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  HMPV कोरोना इतकाच भयानक? आजारावर लस उपलब्ध आहे का? आरोग्य तज्ज्ञाने दिली माहिती

HMPV कोरोना इतकाच भयानक? आजारावर लस उपलब्ध आहे का? आरोग्य तज्ज्ञाने दिली माहिती

Jan 07, 2025 10:48 AM IST

Is there a vaccine for HMPV disease In Marathi: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये एका नव्या आजाराने हाहाकार माजवल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. हा आजार जगभरात वेगाने पसरत आहे. दरम्यान या आजाराने भारतातही धडक दिली आहे.

What are the symptoms of HMPV
What are the symptoms of HMPV (Freepik)

Is HMPV the same as Corona in Marathi:  चार-पाच वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. या आजाराने जगभरात लाखो लोकांचा बळी घेतला होता. चीनमधून सुरु झालेली ही महामारी जगभरासह भारतातही भयानक परिणाम देणारी ठरली होती. या महामारीमुळे लोक हादरून गेले होते. ही परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत कठीण ठरली होती. त्यामुळे प्रत्येकजण तो काळ आठवून निराश होतो. अशी स्थिती पुन्हा उद्भवू नये असेच प्रत्येकाला वाटते. परंतु सध्या एका नव्या आजाराने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये एका नव्या आजाराने हाहाकार माजवल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. हा आजार जगभरात वेगाने पसरत आहे. दरम्यान या आजाराने भारतातही धडक दिली आहे. या आजाराचे नाव HMPV असे आहे. भारतातसुद्धा या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

HMPV हा आजार कोरोनासारखाच आहे का? तितक्याच वेगाने पसरतो का? त्यावर कोणते औषध उपलब्ध आहे का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत. परंतु या आजाराबाबत विविध मते आता समोर येत आहेत. याबाबत तज्ज्ञ आपली मते मांडताना आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत. दरम्यान आरोग्य विश्लेषक डॉ. अविनाश भोंडवे यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या आजाराबाबत काही महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

कोरोना इतकाच भयानक आहे HMPV?

डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, हा आजार कोरोनासारखाच श्वसनाचा आजार आहे. त्याची लक्षणेसुद्धा सारखी आहेत. मात्र हा आजार इतका घाबरण्यासारखा नाही. कारण कोरोनाचा विषाणू वेगळा आणि अगदी नवा होता. मात्र एचएमपीव्ही हा आजार याआधी २००१ मध्येच समोर आला होता. या आजाराबाबत आधीच वैद्यकीय क्षेत्रात माहिती आहे. यावर बऱ्याचवेळा अभ्याससुद्धा झाला आहे. हा आजार जवळपास १० दिवस राहतो आणि त्यांनतर तो कमी येऊ लागतो. शिवाय कोरोनपेक्षा याच्या प्रसाराचा वेग कमी आहे. त्यामुळे याबाबत फारसे घाबरण्याचे कारण नाही. असे त्यांनी म्हटले आहे..

HMPV आजारावर लस उपलब्ध आहे का?

डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, या आजारावर सध्या तरी लस उपलब्ध नाही. कारण याआधी इतक्या प्रमाणात या आजाराची लागण झाली नव्हती. परंतु आता या आजारावर लस काढायची झाल्यास अगदी एका महिन्यातसुद्धा लस तयार करता येईल. कारण या आजाराबाबत आधीच माहिती आहे आणि त्यावर अभ्यास झाला आहे. त्यामुळे लोकांनी जास्त न घाबरता कोरोना काळात घेतलेली काळजी घेणे आवश्यक आहे.

Whats_app_banner