थायलंडच्या सौंदर्याचा घ्या आस्वाद, IRCTC चा बजेट फ्रेंडली पॅकेज, करा फिरायला जायचे प्लॅन!-irctcs budget friendly package to thailand from kochi ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  थायलंडच्या सौंदर्याचा घ्या आस्वाद, IRCTC चा बजेट फ्रेंडली पॅकेज, करा फिरायला जायचे प्लॅन!

थायलंडच्या सौंदर्याचा घ्या आस्वाद, IRCTC चा बजेट फ्रेंडली पॅकेज, करा फिरायला जायचे प्लॅन!

Aug 21, 2024 10:55 PM IST

IRCTC Travel Package: तुम्ही थायलंडला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आधी आयआरसीटीसीचे हे पॅकेज पाहा. जाणून घ्या हा बजेट फ्रेंडली पॅकेज.

आयआरसीटीसीचा थायलंडचा पॅकेज
आयआरसीटीसीचा थायलंडचा पॅकेज (unsplash)

IRCTC Package To Thailand From Kochi: थायलंड हा आग्नेय आशियातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे, जो जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, अफाट नैसर्गिक सौंदर्य, चमचमीत पदार्थ आणि अत्यंत मैत्रीपूर्ण लोक यांना पाहून थायलंडला पर्यटनाचा स्वर्ग मानले जाते. म्हणूनच थायलंडला अनेकदा एक असा आकर्षक डेस्टिनेशन मानले जाते जे आपल्याला कधीही निराश करत नाही. खासगी टूर कंपन्यांनी आयोजित केलेल्या ट्रिप्सपासून दूर राहू इच्छिणाऱ्यांना भारतीय रेलवे कॅटरिंग आणि टूरिजम कॉर्पोरेशन (IRCTC) ने सुरू केलेल्या रोमांचक थायलंड पर्यटन पॅकेजेसचा आनंद घेता येईल. बँकॉक आणि पटायासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांचाही समावेश IRCTC च्या थायलंड पर्यटन पॅकेजमध्ये आहे. दरम्यान, पाच दिवसांची ही यात्रा २३ ऑगस्टपासून कोचीहून सुरू होईल. पर्यटक थायलंडमधील प्रसिद्ध बौद्ध मंदिरे, वन्यजीव उद्याने, शांत दृश्य आणि रंगीबेरंगी बँकॉक शहर यांचा आनंद पर्यटन पॅकेज अंतर्गत घेऊ शकतात.

महत्त्वाच्या गोष्टी

- श्रीराचा टायगर झू, पटायामधील जागतिक प्रसिद्ध अल्काझार कॅबरे, कोरल आयलंडला रोमांचक स्पीडबोट राइड, पटायाचा सुंदर फ्लोटिंग मार्केट, नोंग नूच ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डन, सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्क देखील या पॅकेजचा भाग म्हणून भेट देण्याच्या यादीत आहेत.

- IRCTC चा थायलंड पर्यटन पॅकेज कोचीहून जाण्याचा आणि परत येण्याचा विमान तिकिट, एअर कंडिशन वाहने, आरामदायक रहाण्याची व्यवस्था, भारतीय रेस्टॉरंट्समध्ये स्वादिष्ट जेवण, सर्व पर्यटन केंद्रांवरील प्रवेश तिकिटे, इंग्रजी बोलणारा स्थानिक मार्गदर्शकांची सेवा, व्हिसा प्रक्रिया शुल्क आणि प्रवास विमा यासह ५७,६५० रुपयांपासून उपलब्ध आहे.

- मर्यादित सीट उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी ८२८७९३२०८२ वर संपर्क साधा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग