मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  IRCTC Tour Package: रेल्वेसह वाराणसी, गया आणि जगन्नाथ पुरीला भेट देण्याची संधी!

IRCTC Tour Package: रेल्वेसह वाराणसी, गया आणि जगन्नाथ पुरीला भेट देण्याची संधी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 02, 2022 12:40 PM IST

आईआरसीटीसी तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे.

श्री जगन्नाथ यात्रा
श्री जगन्नाथ यात्रा (@IRCTCofficial / Twitter )

जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आईआरसीटीसी तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. या विशेष पॅकेज अंतर्गत तुम्हाला दक्षिण भारतात जाण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजदरम्यान वाराणसी, बैद्यनाथ, पुरी, भुवनेश्वर, कोणार्क आणि गया या शहरांना भेट दिली जाईल.'श्री जगन्नाथ यात्रा' नावाचे हे ७ रात्र आणि ८ दिवसांचे पॅकेज दिल्लीपासून सुरू होणार आहे. आईआरसीटीसीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून हे पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज २८,५६० रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते.

प्रवास कधी सुरू होणार?

हे पॅकेज ८ नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून सुरू होईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज नाही. या पॅकेजअंतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून प्रवास केला जाणार आहे. प्रवासी दिल्ली सफदरजंग, गाझियाबाद, अलीगढ, तुंडला आणि कानपूर स्थानकांवरून बोर्डिंग/डिबोर्डिंग करू शकतील.

टूर पॅकेजचे तपशील

पॅकेजचे नाव - श्री जगन्नाथ यात्रा (NZBG09)

ट्रिप किती काळ असेल?- ७ रात्री आणि ८ दिवस

निर्गमन तारीख – ८ नोव्हेंबर २०२२

जेवण योजना - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण

बोर्डिंग/डिबोर्डिंग- दिल्ली सफदरजंग, गाझियाबाद, अलीगड, तुंडला आणि कानपूर स्टेशन

टूर पॅकेजची किंमत?

पॅकेजच्या खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास, कंफर्ट क्लास आणि ट्रिपल ऑक्यूपेंसी प्रति व्यक्ती खर्च २८,५६० रुपये आहे. त्याच वेळी, सिंगल ऑक्यूपेंसीचा प्रति व्यक्ती खर्च ३२,८४५ रुपये आहे. ५ ते ११ वर्षांच्या मुलासाठी २५,७०५ रुपये शुल्क आकारले जाते. सुपीरियर क्लासमध्ये डबल आणि ट्रिपल ऑक्यूपेंसीवरील प्रति व्यक्ति खर्च ३४,२७५ रुपये आहे. त्याच वेळी, सिंगल ऑक्यूपेंसी खर्च ३९,४२० रुपये आहे. ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलासाठी ३०,८५० रुपये शुल्क आकारले जाते.

कसे बुक करायचे?

माहितीनुसार, प्रवासी या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करू शकतात. बुकिंग आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे देखील केले जाऊ शकते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या