मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thailand Tour: डिसेंबरमध्ये बनवा थायलंडला फिरायला जायचा प्लॅन, आईआरसीटीसीने आणली आहे बेस्ट ऑफर

Thailand Tour: डिसेंबरमध्ये बनवा थायलंडला फिरायला जायचा प्लॅन, आईआरसीटीसीने आणली आहे बेस्ट ऑफर

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 19, 2022 11:51 AM IST

IRCTC Thailand Tour Package: स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांशिवाय थायलंड मधील मंदिरांचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे.

थायलंड ट्रिप
थायलंड ट्रिप (Freepik)

Travel & Tourism: थायलंड हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे वर्षातील बहुतेक महिने पर्यटकांनी भरलेले असते. येथे अनेक समुद्रकिनारे आणि बेटे आहेत, जे तुमची सुट्टी संस्मरणीय बनवू शकतात. स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांशिवाय येथील मंदिरांचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे. त्यामुळे जर तुम्ही बजेटमध्ये परदेश प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आईआरसीटीसी ने नुकतेच एक टूर पॅकेज लॉन्च केले आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी पैशात येथे प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

पॅकेज तपशील

पॅकेजचे नाव - आनंददायी थायलंड

पॅकेजचा कालावधी - ५ रात्री आणि ६ दिवस

प्रवास मोड - फ्लाइट

डेस्टिनेशन कवर्ड - बँकॉक, पट्टाया

प्रस्थान तारीख- ५ डिसेंबर ते १० डिसेंबर 2022

प्रवास कुठून सुरु होणार? - लखनऊ

'ही' सुविधा मिळेल

प्रवासासाठी फ्लाइट सुविधा उपलब्ध असेल.

मुक्कामासाठी हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.

५ नाश्ता, ५ लंच आणि ४ डिनरची सुविधा उपलब्ध असेल.

व्हिसा शुल्क आणि प्रक्रिया शुल्क पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.

रोमिंगसाठी वाहनाची सुविधा उपलब्ध असेल.

तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळेल.

प्रवासासाठी 'इतके' शुल्क लागेल

या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला ७३,७०० रुपये मोजावे लागतील.

दोन लोकांना प्रति व्यक्ती ६२,९०० रुपये शुल्क भरावे लागेल.

तीन लोकांना प्रति व्यक्ती ६२,९०० रुपये शुल्क भरावे लागेल.

मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी, बेडसह ६०,४०० आणि बेडशिवाय ५४,३०० भरावे लागतील.

'असे' करू शकता बुकिंग

तुम्ही या टूर पॅकेजसाठी आईआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, तुम्ही आईआरसीटीसी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

 

WhatsApp channel

विभाग