IRCTC Mahashivratri Package: देशातील पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी IRCTC नेहमीच टूर पॅकेज लाँच करत असते. येणाऱ्या प्रत्येक सण-फेस्टिव्हल यानुसारही वेगवगेळे पॅकेज ते जाहीर करत असतात. असेच आता येणाऱ्या ८ मार्चच्या महाशिवरात्री निमित्ताने खास टूर पॅकेज आणले आहे. दक्षिण भारत - महा शिवरात्री विशेष असे याचे नाव आहे. यामध्ये तुम्हाला मुंबईतून दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी नेले जाईल. शिवभक्तांना दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांचे दर्शन दिले जाणार आहे. चला जाणून घेऊया महा शिवरात्री स्पेशल टूर पॅकेजबद्दल...
यंदा ८ मार्च रोजी देशात महाशिवरात्री साजरी होणार आहे. अशा प्रसंगी IRCTC ने शिवभक्तांसाठी खास सवलत आणली आहे. तुम्हाला फक्त ३८,००० रुपयांमध्ये मुंबईहून दक्षिण भारतात नेले जाईल. या टूर पॅकेजचे नाव आहे दक्षिण भारत - महा शिवरात्री स्पेशल (WMA47A). हे शिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच ७ मार्च २०२४ ते १२ मार्च २०२४ पर्यंत सुरू होते.
IRCTC झोनल ऑफिस मुंबई 'दक्षिण भारत टूर' आयोजित करणार आहे. यामध्ये तुम्हाला मदुराई-रामेश्वरम-कन्याकुमारी-त्रिवेंद्रमला फिरायला घेऊन जाणार आहेत. IRCTC च्या या सर्वात किफायतशीर टूर पॅकेजमध्ये दक्षिण भारतातील पवित्र स्थळांना भेट देण्याची संधी दिली जात आहे.
या टूर पॅकेजमध्ये तुम्ही मुंबई ते मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी, या विमानाने प्रवास कराल. त्रिवेंद्रम, कोवलम आदी ठिकाणांना भेट दिली जाईल. येथे तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल रूम, सकाळचा नाश्ता तसेच दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. याशिवाय तुम्हाला कॅबने या ठिकाणी नेले जाईल.
IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला ५११०० रुपये खर्च करावे लागतील. जर दोन व्यक्तींनी एकत्र प्रवास केला तर भाडे ३९६०० रुपये प्रति व्यक्ती असेल, तर तीन व्यक्तींनी एकत्र प्रवास केल्यास भाडे ३८००० रुपये प्रति व्यक्ती असेल. तर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडसह ३३६०० रुपये आणि बेडशिवाय २९३०० रुपये मोजावे लागतील.
तुम्ही इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला भेट देऊन मुंबईहून दक्षिण भारत टूर पॅकेज बुक करू शकता. किंवा तुम्ही IRCTC टुरिझम ऑफिसला भेट देऊ शकता: 2रा मजला, मेन लाइन स्टेशन बिल्डिंग, CSMT, मुंबई – ४००००१. याशिवाय ९३२१९०१८०५, ८२८७९३१८८६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
संबंधित बातम्या