मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  IRCTC ने आणलय व्हलेंटाईन स्पेशल टूर पॅकेज, पार्टनरसोबत भेट द्या या रोमँटिक डेस्टिनेशनला

IRCTC ने आणलय व्हलेंटाईन स्पेशल टूर पॅकेज, पार्टनरसोबत भेट द्या या रोमँटिक डेस्टिनेशनला

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2023 08:27 PM IST

Valentine Special Tour: व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनवण्यासाठी आयआरसीटीसीने खास रोमँटिक डेस्टिनेशन गोवा टूर पॅकेज काढले आहे. जिथे तुम्ही बजेटमध्ये संपूर्ण गोव्याला भेट देऊ शकता.

व्हलेंटाईन स्पेशल टूर पॅकेज
व्हलेंटाईन स्पेशल टूर पॅकेज (unsplash)

IRCTC Tour Package For Valentine's Day: व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या पार्टनरला काही सरप्राईज द्यायचे असेल तर त्याला रोमँटिक डेस्टिनेशनच्या सहलीला घेऊन जा. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारा व्हॅलेंटाइन वीक खास बनवण्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) ने टूर पॅकेजेस आणले आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहज आणि सर्व सुविधांसह प्रवास करू शकाल. समुद्रकिनारी सुट्टीवर जाण्यासाठी फेब्रुवारी हा सर्वोत्तम हंगाम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही गोव्याला जाऊ शकता. येथील सुंदर स्थळे पाहण्यासाठी तुम्ही टूर पॅकेजची मदत घेऊ शकता.

IRCTC अनेकदा वेगवेगळे टूर पॅकेज घेऊन येतात. ज्यामध्ये राहण्याची, खाण्याची आणि प्रवासाची सोय उपलब्ध आहे. आयआरसीटीसीने व्हॅलेंटाइन स्पेशल टूर पॅकेजच्या नावाने एक योजना आखली आहे. ४ रात्री आणि ५ दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील.

आयआरसीटीसी सोबत करा गोव्याचा प्रवास

टूर पॅकेजचा मोड फ्लाइट आहे. ज्यामध्ये तुम्हाला उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या प्रवासावर नेले जाईल. हे टूर पॅकेज ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आहे. ज्यात नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश आहे. त्याचबरोबर हॉटेलसोबतच कॅबच्या माध्यमातून गोव्यातील सुंदर लोकेशनचा फेरफटका मारण्यात येणार आहे. ज्यामध्ये अगुडा किल्ला, सॅन्क्वेरियम बीच, कँडोलियम बीच, बागा बीच तसेच गोव्याच्या चर्चचा समावेश आहे.

खर्च करावे लागतील इतके पैसे

IRCTC चे टूर पॅकेज अनेकदा बजेटमध्ये असते. गोव्याला जाण्यासाठी दोन व्यक्तींचे भाडे प्रति व्यक्ती ३०,१८० रुपये आहे. व्हॅलेंटाईन स्पेशल बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डेस्टिनेशन ट्रिपवर जायचे असेल तर आयआरसीटीसी टूर पॅकेज योग्य आहेत. अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या