मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  IRCTC Banaras Tour Package: कमी पैशात बनारसला जायच आहे? बुक करा आईआरसीटीसीचे स्वस्त टूर पॅकेज

IRCTC Banaras Tour Package: कमी पैशात बनारसला जायच आहे? बुक करा आईआरसीटीसीचे स्वस्त टूर पॅकेज

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 24, 2022 03:46 PM IST

बनारसला भेट देण्यासाठी तुम्ही स्वस्त आईआरसीटीसी टूर पॅकेज बुक करू शकता. बनारसच्या स्वस्त टूर पॅकेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

बनारस ट्रिप
बनारस ट्रिप (unsplash)

भगवान शिवाचे लाडके शहर म्हणून ओळखले जाणारे बनारस पर्यटनाच्या दृष्टीनेही प्रेक्षणीय आहे. बनारसमध्ये काशी विश्वनाथ मंदिर आहे, जे पाहण्यासाठी लोक लांबून येतात. बनारसला भारताची आध्यात्मिक राजधानी म्हटले जाते. वाराणसी हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे, जे हजारो वर्षांपासून ज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र आहे. येथे आयुर्वेदाचा शोध लागला. पंडित मदन मोहन मालवीय यांनी वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. बनारसचे घाट, मंदिरे, अध्यात्म सर्वांनाच भुरळ घालते. बनारसमध्ये भेट देण्यासाठी अनेक ठिकाण आहेत. तुम्हाला बनारसला भेट द्यायची असेल, तर आईआरसीटीसी वेळोवेळी तुमच्यासाठी उत्तम टूर पॅकेज आणते. बनारसला भेट देण्यासाठी तुम्ही स्वस्त आईआरसीटीसी टूर पॅकेज बुक करू शकता. बनारसच्या स्वस्त टूर पॅकेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

बनारस टूर पॅकेजचे डिटेल्स

रेल्वेच्या या टूर पॅकेजचे नाव आहे 'वाराणसी एक्स जोधपूर-जयपूर'. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना बनारसच्या टूरवर नेण्यात येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही ट्रेन आणि कारने प्रवास करू शकाल.

किती दिवसांची आहे ट्रिप?

बनारसला जाण्यासाठी आईआरसीटीसी टूर पॅकेजचा कालावधी ३ रात्री आणि ४ दिवस आहे. या ट्रिपदरम्यान बनारसच्या प्रसिद्ध तात्विक ठिकाणांना भेट दिली जाईल, ज्यामध्ये काशीची मंदिरे आणि घाटांचा समावेश असेल.

कुठून सुरु होईल ट्रिप?

जयपूर येथून प्रवास सुरू होईल. मरुधर एक्स्प्रेस जयपूरहून बनारसला पाठवली जाईल, जी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता वाराणसी रेल्वे स्थानकावर पोहोचेल. येथून बनारस दर्शनाला सुरुवात होईल.

बनारसला कधी भेट देऊ शकता?

बनारसचे IRCTC टूर पॅकेज ५ डिसेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. यानंतर दर सोमवारी ट्रेन जोधपूरहून बनारसला रवाना होईल.

कोणती पर्यटन स्थळे बघायला मिळणार?

प्रवासादरम्यान तुम्हाला वाराणसीला पोहोचल्यानंतर पहिल्या दिवशी नाश्ता दिला जाईल. त्यानंतर तुम्ही काशी विश्वनाथ मंदिर, काल भैरव मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, भारत माता मंदिराला भेट देऊ शकता. संध्याकाळी गंगा आरतीला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. रात्रीच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी वाराणसीहून सारनाथला नेण्यात येईल. धमेख स्तूप आणि बौद्ध मंदिराला भेट द्यावी लागेल. येथून पुन्हा तुम्हाला वाराणसीला नेले जाईल, तेथून तुम्हाला परतीची ट्रेन मिळेल.

बनारसला जायला किती खर्च येईल?

बनारसच्या प्रवासासाठी रेल्वे तिकीट, पर्यटनासाठी स्थानिक वाहतूक, मुक्कामासाठी हॉटेल रूम, नाश्ता आणि दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था या टूर पॅकेज अंतर्गत केली जाईल. वाराणसी टूर पॅकेजसाठी थर्ड एसी भाडे १४,८२५ रुपये आहे. दुसरीकडे, तुम्ही स्लीपर क्लासने प्रवास करत असाल तर तुम्हाला सुमारे साडेअकरा हजार रुपये खर्च करावे लागतील. दोन लोकांसाठी टूर पॅकेज स्लीपरसाठी ७,४२० रुपये आकारले जाते. त्याच वेळी, तीन लोकांसाठीचे भाडे ६,१५५ रुपयांपर्यंत खाली येईल.

बनारस टूर पॅकेजचा लाभ घेण्यासाठी आजच नोंदणी करा. अधिक तपशीलांसाठी आईआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे तुम्हाला बनारस टूर पॅकेजेसची सर्व माहिती मिळेल.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग