मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Youth Day 2023: तरुणाईला पाठवा हे प्रेरणादायी मेसेज, नवीन पिढीला मिळेल सकारात्मक ऊर्जा!

International Youth Day 2023: तरुणाईला पाठवा हे प्रेरणादायी मेसेज, नवीन पिढीला मिळेल सकारात्मक ऊर्जा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Aug 12, 2023 07:25 AM IST

International Youth Day 2023 Wishes: आंतरराष्ट्रीय युवा दिन जगभरातील नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

 International Youth Day 2023 Wishes in Marathi
International Youth Day 2023 Wishes in Marathi (Freepik )

Youth Day 2023 Messages: आंतरराष्ट्रीय युवा दिन जगभरातील नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. तुम्ही जर या नव्या पिढीतील असाल किंवा तुमच्या आजूबाजूला तरुण असतील तर त्यांना आवर्जून शुभेच्छा द्या. आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२३ हा दिवस नव्या विचाराने साजरा करायला हवा. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे काही शुभेच्छा देत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना युवा दिनानिमित्त विश करू शकता. चला बघुयात आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) शुभेच्छा संदेश...

ट्रेंडिंग न्यूज

तरुणाईला पाठवा हे मेसेज

> तारुण्य हे उच्च उर्जा, सकारात्मकता आणि आत्म्याचे प्रतीक आहे

तुम्हाला युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

> युवा दिनानिमित्त स्वत:ला एक जबाबदार तरुण होण्याचे वचन द्या

देशाच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी काम करा

तुम्ही सदैव उजळत राहा!! हार्दिक शुभेच्छा!!

> आपल्या देशातील तरुणांची ऊर्जा आणि प्रतिभा अतुलनीय आहे

आपण सर्वांनी आपल्या प्रयत्नांनी देशाला नवीन उंचीवर नेण्याची आशा आहे

युवा दिनाच्या शुभेच्छा!!

> उभे रहा, धैर्यवान व्हा, मजबूत व्हा,

सर्व जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्या,

लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते आहात

युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

> नेतृत्व करताना सेवक बना, नि:स्वार्थी राहा

अनंत धैर्य बाळगा, शेवटी यश तुमचेच आहे

युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

> प्रत्येक गोष्टीचा शेवट सुंदर असतो,

जर तो सुंदर नसेल तर तो अंत नसतो,

म्हणून जोपर्यंत सुंदर शेवट मिळत नाही,

तोपर्यंत मेहनत करत रहा, यश तुमची वाट पाहतंय…

युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

 

 

WhatsApp channel