मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Yoga Day: सेलिब्रिटी योगा टीचरने सांगितले महिलांसाठी आवश्यक असलेले योगासन

International Yoga Day: सेलिब्रिटी योगा टीचरने सांगितले महिलांसाठी आवश्यक असलेले योगासन

Jun 21, 2024 03:03 PM IST

International Yoga Day 2024: आलिया भट्टपासून करिना कपूरपर्यंत यांना फिट बनवणाऱ्या सेलिब्रिटी योगा टीचरने महिलांसाठी आवश्यक असलेले योगासन शेअर केले.

महिलांसाठी आवश्यक असलेले योगासन
महिलांसाठी आवश्यक असलेले योगासन (instagram, shutterstock)

Yoga Asanas for Women: योगामुळे आपल्या शरीराबरोबरच मनही निरोगी राहण्यास मदत होते. दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. तसेच प्रत्येक वर्षी एक थीम असते. यंदाची थीम पूर्णपणे महिलांना समर्पित आहे. महिलांनी नियमित योगाभ्यास केल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो. करिना कपूरपासून आलिया भट्टपर्यंत गरोदरपणानंतर पुन्हा आकारात येण्यास मदत करणारी योगा टिचर अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर महिलांसाठी आवश्यक असणारे योगासने शेअर केली आहेत. हे शिकून तुम्ही नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता. महिलांसाठी आवश्यक असणारे योगासन जाणून घ्या.

मलासन

योगाभ्यास केल्याने पीसीओडीच्या लक्षणांपासून महिलांचे संरक्षण होण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठता दूर करते आणि पेल्विक फ्लोर स्नायू सक्रिय करते. मलासन हिप स्नायूंना ताणण्यास देखील मदत करते.

ट्रेंडिंग न्यूज

मलासनातून उत्तानासनाचा सराव

मलासनाच्या मुद्रेत बसणे, उभे राहून पुन्हा मलासनाच्या मुद्रेत बसणे असे केल्यास पचनक्रिया सुधारते. यासोबतच तणाव आणि चिंतेपासूनही आराम मिळतो. मणक्यात लवचिकता येते आणि पोटातील अवयवांची मालिश केली जाते.

बद्धकोणासन

बद्धकोणासन म्हणजे बटरफ्लाय पोझ. हे आसन करण्यासाठी सरळ बसा आणि दोन्ही पायांचे तळवे एकत्र जोडा. मग फुलपाखराच्या पंखांप्रमाणे मांडी वर-खाली हलवा. दररोज एक ते तीन मिनिटे या योगासनाचा सराव केल्याने पोश्चर सुधारते आणि हिप मोबिलिटी वाढते. तसेच मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या दुखण्यापासून आराम मिळतो. त्याच बरोबर बटरफ्लाय पोझ मुळे किडनीच्या आरोग्यासोबतच महिलांमध्ये प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.

महिलांनी हे योगासने केल्याने मिळणारे फायदे

महिलांनी रोज ही योगासने केल्यास शरीरातील लवचिकता वाढते. तसेच गर्भधारणा म्हणजे कंसीव्ह करणे सोपे होते. त्याचबरोबर हार्मोनल असंतुलन व्यवस्थापनास मदत होते आणि पेल्विक स्नायू मजबूत होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel