मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Yoga Day 2024: कसे करावे शशांकासन? पंतप्रधान मोदींनी शेअर केले फायदे, जाणून घ्या

International Yoga Day 2024: कसे करावे शशांकासन? पंतप्रधान मोदींनी शेअर केले फायदे, जाणून घ्या

Jun 19, 2024 03:42 PM IST

Benefits of Shashankasana: आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शशांकासन करण्याची पद्धत आणि फायदे सांगितले आहेत. हे आसन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

शशांकासन
शशांकासन (shutterstock, x)

How to Do Shashankasana: २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासोबतच योगाचे चाहते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योगासने करण्याचे मार्ग आणि फायदे सांगितले आहेत. या मालिकेत पंतप्रधान मोदींनी शशांकासनबद्दल सांगितले आहे. शशांकासन याला रॅबिट पोझ असे देखील म्हणतात. शशांकासन करण्याचे फायदे आणि ते कसे करावे हे जाणून घेऊया.

शशांकासन करण्याची पद्धत

शशांकासन रॅबिट पोझ म्हणून ओळखले जाते. कारण यामध्ये शरीर सशासारखे आकार घेते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनाच्या स्थितीत बसा. म्हणजे गुडघ्यावरून पाय वाकवून मग तळव्याच्या वर नितंब ठेवून बसा. आपले तळवे मांडीवर ठेवून कंबर सरळ ठेवा. आता दोन्ही गुडघे जास्तीत जास्त पसरवा. या दरम्यान लक्षात ठेवा की पायाची बोटे एकमेकांना स्पर्श करतील. आपले तळवे दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये जमिनीवर ठेवा आणि श्वास बाहेर सोडा. आता तळवे पुढे सरकवा आणि चेहरा समोर ठेवा. चेहरा पुढे आहे आणि हनुवटी जमिनीवर असेल याची काळजी घ्या. तसेच हात एकमेकांच्या बरोबर असावेत. थोडा वेळ या स्थितीत राहा आणि रिलॅक्स व्हा. तसेच, सामान्य मार्गाने श्वास घ्या आणि श्वास सोडा. काही सेकंद या आसनात राहिल्यानंतर सामान्य वज्रासनाच्या मुद्रामध्ये या आणि नंतर पाय बाजूला वळवून सरळ करा. आता गुडघे सरळ ठेवून बसा.

ट्रेंडिंग न्यूज

शशांकासन करण्याचे फायदे

- वज्रासन केल्याने पचनशक्ती सुधारते. त्याचबरोबर शशांकासन आसनाचा दररोज सराव केल्याने बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारते.

- ज्यांना पाठीच्या वरच्या भागात किंवा पाठ दुखत असते. त्यांच्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.

- शशांकासनामुळे तणाव दूर होण्यास आणि राग शांत होण्यास मदत होते.

- ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी शशांकासन करणे टाळावे.

- त्याचबरोबर संधिवात किंवा गुडघेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी सुद्धा शशांकासन करणे टाळावे.

- ज्यांना पाठ आणि कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा शशांकासन करणे टाळावे.

WhatsApp channel