मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Yoga Day 2024: अनन्या पांडेप्रमाणेच पातळ लोकही ‘या’ योगासनांनी वाढवू शकतात वजन

International Yoga Day 2024: अनन्या पांडेप्रमाणेच पातळ लोकही ‘या’ योगासनांनी वाढवू शकतात वजन

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 21, 2024 03:38 PM IST

International Yoga Day 2024: केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर वजन वाढवण्यासाठीही योगाभ्यास केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया वजन वाढण्यासाठी कोणता योगाभ्यास केला जातो.

international yoga day 2024: अनन्या पांडे
international yoga day 2024: अनन्या पांडे (hindustan)

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगाभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, लठ्ठ व्यक्तीला योगाच्या मदतीने पातळ होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे पातळ व्यक्तीही योगाच्या मदतीने योग्य बॉडीशेप मिळवू शकतात. अनन्या पांडेने योगाभ्यासाच्या मदतीने आपल्या दुबळ्या बॉडी लुकला परफेक्ट शेप दिला आहे. आज २१ जून रोजी अंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया कोणता योग केल्यामुळे तुमचे वजन वाढते...

ट्रेंडिंग न्यूज

भुजंगासन

भुजंगासन केल्याने स्नायू ताणले जातात आणि खांदे, पाठ, छातीसह कमरेच्या वरच्या भागातील स्नायू वाढण्यास मदत होते. भुजंगासन केल्याने स्नायूंचा आकार वाढतो तसेच स्नायू ताणले जातात. ज्यामुळे शरीराचा आकार बदलू लागतो.
वाचा: पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होत असेल तर करा 'ही' योगासने, समस्या होईल दूर

मांडूकासन

मांडूकासन देखील वजन वाढवण्यास मदत करणारी मुद्रा आहे. फ्रॉग पोज केल्याने पचनक्रिया सुधारते. हे आसन पोटाच्या अंतर्गत अवयवांना उत्तेजित करते. तसेच कंबर आणि नितंबाचे स्नायू ताणतात. ज्यामुळे येथील स्नायू वाढतात आणि शरीराचा आकार बदलण्यास मदत होते.
वाचा: लग्नापूर्वी चेहऱ्यावर चमक आणायची? मग हा ज्यूस प्यायला नक्की सुरुवात करा

सर्वगासन

सर्वगासनाच्या साहाय्याने चयापचय वाढण्यास मदत होते. आपण जे खाद्य खात आहोत त्यामधील पोषकतत्वे शोषूण घेण्यास हे आसन मदत करते. त्यामुळे हे आसन केल्यास वजन वाढण्यास मदत होते.
वाचा : पावसामुळे होतंय केसांचं नुकसान? पावसाळ्याच्या हंगामात ‘अशी’ घ्या केसांची खास काळजी!

धनुरासन

धनुरासनाच्या सरावात शरीराचे जवळजवळ सर्व स्नायू ताणले जातात. दुबळे लोक जेव्हा हे आसन करतात तेव्हा त्यांचे स्नायू ताणले जातात आणि योग्य आहाराच्या मदतीने वजन वाढण्यास मदत होते. तथापि, अगदी पातळ लोकांना देखील योगाभ्यास करण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे चांगल्या ट्रेनरच्या मदतीनेच या योगासनांचा सराव करा.
वाचा : गॅस सिलिंडर लवकर संपतो का? फॉलो करा ‘या’ टिप्स, महिन्यापेक्षा जास्त काळ टिकेल

जर तुम्ही खूप दुबळे असाल तर रोजच्या रुटीनमध्ये ही योगासने करून तुम्ही योग्य वजन मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला जवळपास १५ मिनिटे हा योगाभ्यास करावा लागेल. तुम्हाला माहिती आहे का काही योगासने करुन पोट फुगणे आणि गॅसचा त्रास कमी होतो. त्यामध्ये अपनासन, सेतुब्धा सर्वंगासन, बाळासन, उत्तानासन आणि पश्चिमोत्तानासनचा समावेश होतो.

WhatsApp channel
विभाग