योग ही भारताची खरी ओळख आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारतात योग केला जातो. भारताने घेतलेल्या पुढाकारानंतर योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. त्यानंतर संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला.२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यानंतर २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आता योग दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी योगाचे महत्त्व सांगितले आहे.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसात भद्रासन, पदहस्तासन आणि अर्धचक्रासनाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ शेअर करत त्यांनी प्रत्येक हासनाचे फायदे देखील सांगितले आहेत. चला जाणून घेऊया पदहस्तासन आणि अर्धतक्रासनाचे काय आहेत फायदे.
वाचा: चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत आहात? मग घरच्या घरी फिट आहात की नाही तपासून पाहा
पदहस्तासन करण्यासाठी सर्वप्रथम योग मॅटवर उभे राहा आणि दोन्ही हात नितंबांवर ठेवा. श्वास घेताना गुडघे मुलायम करा. कंबर वाकवून पुढे झुका. शरीराचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. नितंब आणि टेलबोन किंचित मागे घ्या. हळू हळू नितंब वर करा आणि वरच्या मांड्यांवर दाब येऊ लागेल. तुमचे हात पायाच्या पंजाच्या खाली दाबा. तुमचे पाय एकमेकांना समांतर असतील. तुमची छाती पायाच्या वरच्या भागाला स्पर्श होईल याची काळजी घे. डोके खाली झुकवा आणि पायांच्या मधोमधून पाहत रहा. १५ ते ३० सेकंद स्थिर उभे राहा. जेव्हा तुम्हाला ही स्थिती सोडायची असेल तेव्हा पोट आणि खालच्या अंगांना आकुंचन द्या. पुन्हा दीर्घ श्वास घ्या.
वाचा: फाटलेले ओठ लवकर बरे करतील हे घरगुती उपाय, पुन्हा होतील मऊ आणि गुलाबी
पदहस्तासन या आसनामुळे पाठ, नितंब, पिंडऱ्या आणि घोट्याला चांगला ताण येतो. तसेच मन शांत होते आणि चिंतेपासून आराम मिळतो. डोकुदुखी आणि झोपायची समस्या असेल तर पदहस्तासन मदत करते. पोटाच्या अंतर्गत पचन अवयवांना चांगला मसाज देऊन पचन सुधारते. मूत्रपिंड आणि यकृत हे चांगले काम करतात. मांड्या आणि गुडघे मजबूत होतात. उच्च रक्तदाब, दमा, नपुंसकता, सायनुसायटिस आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार कमी होतात.
वाचा: फादर्स डेला बाबांसाठी बनवा खास एग्लेस चॉकलेट केक, सोपी आहे रेसिपी
संबंधित बातम्या