International Yoga Day 2024 : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन? काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Yoga Day 2024 : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन? काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या...

International Yoga Day 2024 : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन? काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या...

Updated Jun 20, 2024 02:09 PM IST

International Yoga Day 2024: दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे खास महत्त्व आहे.

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन? काय आहे यंदाची थीम?
का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन? काय आहे यंदाची थीम?

International Yoga Day 2024: दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे खास महत्त्व आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजर केला जातो.

काय आहे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ची थीम?

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे. यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशा प्रकारे संतुलित राखले जाईल, याविषयीच्या माहितीवर भर दिला जाईल. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ हा दिवस साजरा करण्यासाठी आणि योगाच्या सरावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजनही केले जाईल.

Pressure Cooker Tips: कुकर फुटल्याने होऊ शकतो मोठा अपघात, स्वयंपाक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास काय?

२०१४मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची कल्पना मांडली, तेव्हापासून जगभरात हा खास दिवस साजरा केला जात आहे. आपल्या भाषणात, महासभेच्या ६९व्या सत्राच्या उद्घाटनावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘योग ही आपल्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन आणि शरीर, विचार आणि कृती यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देते. योग हा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी एक सर्वांगीण मौल्यवान दृष्टीकोन आहे. योग म्हणजे फक्त व्यायाम नाही; तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकत्वाची भावना शोधण्याचा हा एक मार्ग आहे.’

World Music Day 2024: का साजरा केला जातो जागतिक संगीत दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व

> आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व बहुआयामी आहे. योगाच्या सरावाचा आणि जागतिक स्तरावर त्याचे फायदे यांचा प्रचार करणे हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे.

> योगाबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे ही सर्वात प्रमुख बाब आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन या योगा सारख्या प्राचीन प्रथेवर प्रकाश टाकतो, जिने लोकांना आपले जीवन सुधारण्यासाठी आपल्या शरीराची क्षमता शोधण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

> हा दिवस शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे असंख्य फायदे या बद्दल जागरूकता निर्माण करणारा आहे. यात तणाव व्यवस्थापन, शारीरक लवचिकता, सामर्थ्य आणि एकूण आरोग्यासाठी योगास प्रोत्साहन देणे या गोष्टी समाविष्ट आहेत.

> आंतरराष्ट्रीय योग दिवस जागतिक एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची भावना वाढवतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि राष्ट्रीयत्व असणारे लोक योग दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात.

> आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये जागतिक आरोग्य सुधारण्याची क्षमता आहे. हा दिवस लोकांना योग करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करणारा आहे.

Whats_app_banner