International Yoga Day 2024: चुकीच्या पद्धतीने केलेल्या योगाभ्यासामुळे बिघडते शरीराचे आरोग्य!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Yoga Day 2024: चुकीच्या पद्धतीने केलेल्या योगाभ्यासामुळे बिघडते शरीराचे आरोग्य!

International Yoga Day 2024: चुकीच्या पद्धतीने केलेल्या योगाभ्यासामुळे बिघडते शरीराचे आरोग्य!

Jun 21, 2024 09:46 AM IST

Yoga Mistakes: योगाभ्यास करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची इजा टाळता येईल. जाणून घ्या योगाभ्यास करताना कोणत्या चुका करु नये.

योगाभ्यास करताना कोणत्या चुका टाळाव्या
योगाभ्यास करताना कोणत्या चुका टाळाव्या (freepik)

Avoid These Yoga Mistakes: योगा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तज्ञांच्या मार्गदर्शनात त्याचा सराव करणे आवश्यक आहे. तुम्ही स्वत:हून योगाभ्यास करत असाल तर सर्व नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त योगाभ्यास करण्याचा प्रयत्न केल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसान होण्याची भीती असते. चुकीच्या योगाभ्यासामुळे स्नायू ताणण्याबरोबरच या सर्व नुकसानीची भीती असते. चुकीच्या पद्धतीने योगाभ्यास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका करू नये हे जाणून घ्या.

शरीरातील स्नायूंमध्ये ताण येण्याची भीती

योगादरम्यान कधीही स्नायू ताणले जाऊ शकतात. पण काही वेळा अनेक वर्षे सातत्याने चुकीच्या पद्धतीने योगाभ्यास केल्याने हा ताण येतो. त्यामुळे योगासन करण्याची योग्य पद्धत समजून घेऊन त्याचा सराव करणे गरजेचे आहे. तसेच जास्त स्ट्रेचिंग टाळावे. पाय, गुडघे, मनगट, हिप्स, कंबर कुठेही स्नायू ताणले गेल्यास वेदना होऊ शकते. ही वेदना दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योगासनांच्या साहाय्याने ते बरे केले जाते.

योगाभ्यास करताना करू नका या चुका

वॉर्मअप

योगा सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ वॉर्मअप करणं गरजेचं आहे. जेणेकरून शरीरातील स्ट्रेच वाढेल आणि जेव्हा तुम्ही योगा सुरू कराल तेव्हा कोणत्याही प्रकारच्या स्नायूंवर ताण येणार नाही. नेक रोल, शोल्डर रोल आणि काही ट्विस्ट मुळे तुमचे शरीर योगासाठी तयार होते.

जबरदस्ती करू नका

बळजबरीने कोणताही योग करण्याचा प्रयत्न करू नका. क्षमतेपेक्षा जास्त मेहनत करून योगा केल्यास इजा होण्याचा धोका वाढतो.

हळूहळू सराव करा

पहिल्याच बॉलवर षटकार मारला जाईलच असे नाही. योगा करतानाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला एकाच वेळी पूर्ण एक्सपर्ट होऊ शकणार नाही किंवा तुम्ही योगाही नीट करू शकणार नाही. म्हणून हळूहळू प्रयत्न करा आणि दररोज प्रयत्न वाढवा. तरच योगाभ्यास केला जातो आणि इजा होण्याची भीती राहत नाही.

पोश्चरमधून बाहेर येताना काळजी घ्या

योगाभ्यासादरम्यान जेव्हा तुम्ही एखाद्या मुद्रामध्ये किंवा पोश्चरमध्ये असाल तेव्हा त्यातून परत येण्याचा नियम पूर्णपणे पाळावा. कपोतासन, मंडूकासन यांसारख्या मुद्रांमधून परत येताना हळूहळू शरीराला मोकळे करून आराम द्यावा.

शेवटची अवश्य करा शवासन

योगाच्या शेवटच्या टप्प्यात दोन ते तीन मिनिटे शवासन केल्याने शरीर आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. त्यामुळे शेवटी शवासन करायला विसरू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner