International Women's Day Wishes, Message and Quotes: जगभरात ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे महिलांना समर्पित असतो. तुमच्या आयुष्यातील खास महिलांचा हा दिवस आणखी खास असावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना खास शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही हे सुंदर मॅसेज, कोट्स शेअर करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
आदिशक्ती तू
प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी तू
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती सून आहे,
ती सासू आहे, ती आजी आहे
पण याआधी ती एक स्त्री आहे
जिचा सर्वांना अभिमान आहे
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे
यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे
तुझ्या कर्तुत्वाची झालर
स्त्रीशक्तीचा होऊ दे
पुन्हा एकदा जागर...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू भार्या, तू भगिनी
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता
तू नवयुगाची प्रेरणा
या जगाची भाग्यविधाता
Happy Women's Day!
ज्याला स्त्री आई म्हणून कळली
तो जिजाऊचा शिवबा झाला,
ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली
तो राधेचा श्याम झाला
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली
तो सितेचा राम झाला....
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
इंग्रजीत म्हणतात लेडी
मराठीत म्हणतात महिला
जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला
अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान
कायम करा अशा स्त्रीचा सन्मान
Happy Women's Day!
जी नेहमी करते केवळ त्याग
दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार
मग तिलाच का केवळ त्रास
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्त्री म्हणजे एक खडतर वाट
अशक्य ते शक्य करून दाखवणारी
अन्यायाला न्या मिळवून देणारी
जी बदलेल समाजाची वहिवाट
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्मरण त्यागाचे
स्मरण शौर्याचे
स्मरण ध्यासाचे
स्मरण स्त्री पर्वाचे
Happy Women's Day!
स्त्रीमध्ये असते शक्ती अपार
स्त्री आहे या सृष्टीचा आधार
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान
कारण तीच आहे प्रत्येकाच्या जीवनाचे सार
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नारी हीच शक्ती आहे नराची
नारी हीच शोभा आहे घराची
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
संबंधित बातम्या