मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Women's Day 2024: यंदाच्या महिला दिनाला तुमच्या पार्टनरला द्या स्पेशल फील, फॉलो करा या पद्धती

International Women's Day 2024: यंदाच्या महिला दिनाला तुमच्या पार्टनरला द्या स्पेशल फील, फॉलो करा या पद्धती

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 06, 2024 10:32 PM IST

Women Day Special: जर स्त्री एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही स्वरूपात असेल तर जीवन नीट आणि आनंदी बनते. जर तुम्हालाही या महिला दिनाला तुमची बायको किंवा गर्लफ्रेंडला खास फील करून द्यायचे असेल तर या गोष्टी फॉलो करा.

महिला दिनाला पार्टनरला स्पेशल फील करून देण्यासाठी टिप्स
महिला दिनाला पार्टनरला स्पेशल फील करून देण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Make Lady Partner Feel Special: दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. कुटुंब, समाज आणि राष्ट्र उभारणीत महिलांची भूमिका महत्त्वाची असते. महिलांच्या विशेष योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही स्वरूपात स्त्री असेल तर जीवन नीट आणि आनंदी होते. जर तुम्हालाही असे वाटत असेल की या महिला दिनाला तुमची पत्नी किंवा गर्लफ्रेंडला स्पेशल फील करून द्यावे तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

निर्णयांना पाठिंबा द्या

भारतात आजही बहुतांश महिला त्यांच्या आयुष्याशी संबंधित निर्णय स्वतः घेत नाहीत. पण या महिला दिनी तुमच्या जोडीदाराला तसे स्वातंत्र्य द्या. एखाद्या स्त्रीला ती पुरुषांपेक्षा कमी दर्जाची नाही हे जाणवून देण्यासाठी तिला मोटिवेट करा आणि सपोर्ट करा. तुमच्या जोडीदाराला आयुष्यात काय करायचे आहे हे तिला स्वतः ठरवू द्या.

आवडी-निवडींची काळजी घ्या

प्रत्येक स्त्रीसाठी ही खूप खास भावना असते की तिचा पार्टनर तिच्या आवडी-निवडीची विशेष काळजी घेतो. अशा परिस्थितीत या महिला दिनानिमित्त तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी तिच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तिला खास वाटण्यासाठी काही खास प्लॅन देखील करू शकता.

त्यांचे म्हणणे ऐका

अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळे कपल्स एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात कंटाळा येण्यासोबतच रोमान्स सुद्धा गायब होऊ लागतो. पण या महिला दिनी तुमच्या बिझी शेड्युलमधून तुमच्या जोडीदारासाठी दररोज थोडा वेळ काढण्याचा संकल्प करा. यावेळी त्यांना त्यांचे महत्त्व समजावून सांगा. त्यांच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणे सुरू करा, त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा हा छोटासा प्रयत्न तुमच्या जोडीदाराचा आत्मविश्वास तर वाढवेलच पण ती तुमच्यासाठी खास आहे याची तिला जाणीव करून देईल.

फायनानशियल गिफ्टने जीवन करा सुरक्षित

साधारणपणे महिला दिनी लोक त्यांच्या जोडीदाराला खास गिफ्ट देतात. तुम्हीही असाच काहीतरी विचार करत असाल तर त्यांना कार्ड, शोपीस यांसारख्या वस्तूभेट देण्याऐवजी त्यांना फायनानशियल गिफ्ट देण्याचे प्लॅन करा. जेणेकरुन भविष्यात त्यांना कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि ते पैसे त्यांच्या गरजेनुसार वापरू शकतील. यासाठी एकरकमी रक्कम खर्च करून तुम्ही तुमच्या खास महिलेच्या नावावर ठराविक रकमेची एफडी देखील काढू शकता.

ट्रिप प्लॅन करा

स्त्रीसाठी सर्वात मोठी भेट म्हणजे तिच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणे असते. पण आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कपल्सना एकमेकांसाठी दर्जेदार वेळ काढता येत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर या महिला दिनी तुमच्या आयुष्यातील खास महिलेसाठी थोडा वेळ काढा आणि तिला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा. असे केल्याने त्यांना चांगले तर वाटेलच शिवाय तुमच्या कंटाळवाण्या नात्यातही नवीन जीवन येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)