International Women Day: महिलांना सर्वात जास्त असतो या आजारांचा धोका, शरीराची रचना असते कारणीभूत-international women day 2024 know how women body structure can increase risk of these diseases ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Women Day: महिलांना सर्वात जास्त असतो या आजारांचा धोका, शरीराची रचना असते कारणीभूत

International Women Day: महिलांना सर्वात जास्त असतो या आजारांचा धोका, शरीराची रचना असते कारणीभूत

Mar 07, 2024 11:37 PM IST

Women's Health Tips: महिलांच्या शरीराची रचना त्यांच्या आजारांसाठी जबाबदार असते. असे काही आजार आहेत जे फक्त स्त्रियांना होतात, ज्याचे कारण म्हणजे त्यांची जीन्स. जाणून घ्या महिलांना कोणत्या आजारांचा धोका जास्त असतो.

जागतिक महिला दिन - महिलांना कोणत्या आजारांचा धोका जास्त असतो
जागतिक महिला दिन - महिलांना कोणत्या आजारांचा धोका जास्त असतो

High Risk Diseases for Women: दरवर्षी महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरातील निम्मी लोकसंख्या असलेल्या महिलांना पुढे जाण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. परंतु समाजात प्रगती करण्यापेक्षा कोणत्याही महिलेचे आरोग्य महत्त्वाचे असते. कारण बहुतांश महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आणि त्यांना योग्य उपचार मिळणे कठीण होते. आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीराच्या संरचनेबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जाणून घ्या महिलांना कोणत्या आजारांचा धोका जास्त असतो.

स्त्रियांच्या शरीरावर जास्त असते रोगांचे आक्रमण

विज्ञानानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना संसर्गजन्य रोगांचा धोका कमी असतो. परंतु त्या ऑटो इम्यून डिसीजला जास्त बळी पडतात.याचे कारण एक्स (X) गुणसूत्र आहे. कारण एक्स क्रोमोसोममध्ये रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित अनेक जनुके असतात. तर महिलांमध्ये दोन एक्स गुणसूत्र असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात ऑटो इम्युनिटी अधिक विकसित होणे स्वाभाविक आहे. ऑटो इम्यून व्यतिरिक्त महिलांना या आजारांचा धोका जास्त असतो.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

स्त्रियांचा प्रजनन अवयव, गर्भाशय ग्रीवा, अगदी लहान असतो. याशिवाय वजाइना आणि सर्विक्समध्ये बर्थ कॅनॉल देखील असतो. जेव्हा सर्वाइकल म्हणजेच गर्भाशयाच्या पेशी वेगाने वाढू लागतात आणि नियंत्रणाबाहेर जातात, त्याला सर्वाइकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणतात.

स्तनाचा कर्करोग

जगभरातील महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो. स्तनाच्या कर्करोगात एका किंवा दोन्ही स्तनांमध्ये पेशी वेगाने पसरू लागतात. त्यामुळे स्तनाचा कर्करोग होतो.

पीसीओडी

दीर्घकाळ स्त्रियांमध्ये पुरूष हार्मोन एंड्रोजनमुळे अशी स्थिती बनते, ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजेच पीसीओडी (PCOD) म्हणतात.

हृदयविकार

स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका झपाट्याने वाढतो.

ऑस्टिओपोरोसिस

कमी वयातच स्त्रियांची हाडे कमकुवत होण्यास सुरुवात होते. पण रजोनिवृत्तीनंतर सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner