International stuttering Day: बोलताना अडखळताय, काय आहेत तोतरेपणावर उपाय? जाणून घ्या त्याची सुरुवातची लक्षणे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International stuttering Day: बोलताना अडखळताय, काय आहेत तोतरेपणावर उपाय? जाणून घ्या त्याची सुरुवातची लक्षणे

International stuttering Day: बोलताना अडखळताय, काय आहेत तोतरेपणावर उपाय? जाणून घ्या त्याची सुरुवातची लक्षणे

Published Oct 22, 2024 10:17 AM IST

Therapy for Stuttering: हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे मुलांच्या किंवा मोठ्यांच्या बोलताना अडखळण्याच्या म्हणजेच तोतरेपणाच्या आजाराबाबत जागरूकता वाढवणे होय.

International Stuttering Day 2024
International Stuttering Day 2024 (freepik)

How to Get Rid of Stuttering:  दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागरूकता दिवस’ जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे मुलांच्या किंवा मोठ्यांच्या बोलताना अडखळण्याच्या म्हणजेच तोतरेपणाच्या आजाराबाबत जागरूकता वाढवणे होय. जे लोक तोतरेपणाच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांना अनेकदा उपहास आणि अपमान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत हा दिवस साजरा करण्यामागे अशा लोकांचा आदर वाढवणे हासुद्धा उद्देश आहे.

एका अहवालानुसार, जगभरात सुमारे सात कोटी लोक तोतरेपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. हेल्थशॉटच्या बातमीनुसार, तोतरेपणा ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जी योग्यरित्या बोलण्यात अडथळा आणते. यामध्ये पीडितेला कोणतीही गोष्ट किंवा शब्द अस्खलितपणे बोलता येत नाही. जे लोक अडखळतात त्यांना काय हवंय हे चांगलंच माहीत असतं पण ते सांगताना त्यांना खूप त्रास होतो.

खासकरून बोलताना अडखळण्याची समस्या लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते. परंतु अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात वृद्ध व्यक्तींनाही याचा त्रास होत आहे. युरोपियन लीग ऑफ स्टटरिंग असोसिएशन, इंटरनॅशनल फ्लुएंसी असोसिएशन आणि आयएसए यांनी १९८८ मध्ये २२ ऑक्टोबर हा 'स्टटरिंग अवेअरनेस डे' म्हणून घोषित केला होता.

तोतरेपणाची सुरुवातीची लक्षणे कोणती?

-शब्द किंवा वाक्य बोलण्यास सुरुवात करण्यात अडचण.

-एकापेक्षा जास्त वेळा शब्दाची पुनरावृत्ती करणे.

-बोलताना चेहऱ्यावर जास्त दाब देणे.

-प्रभावीपणे संवाद साधण्याची मर्यादित क्षमता

-वेगाने डोळे मिचकावणे

-बोलत असताना मुठी घट्ट पकडणे

-ओठ आणि डोके हलणे

या समस्येवर उपचार काय आहे?

असे अनेक उपचार आहेत ज्यामुळे तोतरेपणाच्या समस्येपासून आराम मिळतो आणि बोलण्याचा वेग वाढतो. तोतरेपणावर मात करण्यासाठी स्पीच थेरपीचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये स्पीच थेरपिस्ट सतत काही शब्द बोलण्याचा सराव करतात. या उपायासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. जे स्टॅमर करतात ते किती सराव आणि समर्पण दाखवतात यावर अवलंबून आहे.स्पीच थेरपीसोबतच तोतरेपणाची समस्या योगाद्वारेही कमी करता येते. योगातील ध्यानाचा सराव तणाव आणि चिंता कमी करून व्यक्तीला शांत करण्यासाठी, सकारात्मक फायदे प्रदान करण्यासाठी ओळखला जातो. योगासने आणि श्वासोच्छवासाचे व्यायामाने बोलण्याच्या समस्या सुधारतात.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner